मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील एका महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या आईने मंगळवेढा पोलीसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता तरुणीचा कसून शोध घेत आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील बेपत्ता १९ वर्षीय तरुणी ही पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून ती फ्यूचर अॅकॅडमी मंगळवेढा येथे गेल्या एक वर्षापासून शिकत आहे.
दि.२६ रोजी फ्यूचर अॅकॅडमी मधील शिक्षकाने तिच्या आईस कॉल करुन विचारले की, तुमची मुलगी तुमच्या घरी आली आहे का? ती महाविद्यालयात पेपरला गेलेली
फ्यूचर अॅकॅडमी येथे आली नाही असे समजताच कुटूंबियांनी तिचा सर्वत्र नातेवाईकाकडे व अन्य ठिकाणी शोध घेतला मात्र ती मिळून नाही.
तिचे वर्णन पुढील प्रमाणे वर्ण गोरा, उंची १५३ सें मि., अंगात नेसणेस चुडीदार, शरीरबांधा मध्यम, बोली भाषा मराठी, हिंदी अशा वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज