टीम मंगळवेढा टाईम्स ।
ज्ञात उत्पन्नाच्या १७.१४ टक्के संपती भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करुन कृषी सहायक व सहाय्य केल्याबद्दल पत्नीविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने बुधवारी गुन्हा नोंदला आहे.
काशिनाथ यल्लप्पा भजनावळे (कृषी सहायक, वय ५०), पत्नी किशोरी काशिनाथ भजनावळे (वय ४५, दोघे रा.सिद्धापूर, ता.मंगळवेढा), अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की,
कृषी सहायक भजनावळे यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांच्या पत्नीच्या नावाने संपादित केलेली अपसंपदा रक्कम १४ लाख ९३ हजार ८१७ रुपये इतकी आहे.
लोकसेवक व त्यांच्या पत्नीच्या ज्ञात उत्पन्नाची एकत्रित टक्केवारी काढता ती १७.१४ टक्के आहे. सदरची संपत्ती अपसंपदा आहे.
याची जाणीव असूनही लोकसेवकाच्या पत्नीने त्यास सहाय्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनाद्वारे गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी पार पाडली.
चौकशीतून निष्पन्न
लोकसेवकाकडून सदरची अपसंपदा ही मार्च १९९५ ते जुलै २०१४ या कालावधीत मिळवलेली आहे. यासाठी तत्कालीन चौकशी अधिकारी पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, चंद्रकांत कोळी, विद्यमान पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी केलेल्या चौकशीतून समोर आल्याचे म्हटले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज