मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं न्यूयॉर्क सध्या सुन्न आहे. अमिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सध्या भयाण शांतता आहे. कोरोनाने शहरात थैमान घातलं असून दर 17 व्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. सगळी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरून गेली आहेत. नवे पेशंट्स दाखल करून घ्यायला आता बेड्सही शिल्लक राहिले नाहीत. परिस्थिती अशीच राहीली तर हे शहर उद्धवस्त होईल अशी भीती न्यूयॉर्कच्या महापौरांनी व्यक्त केलीय.
शुक्रवारी एकाच दिवशी 85 जणांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत 450 जणांचा मृत्यू झाला असू 27 हजार बाधित आहेत. सगळी आरोग्य यंत्रणाच कोसळून पडली आहे. काम करायला स्वयंसेवक नाहीत. त्यामुळे तातडीने लष्कराला पाचारण केलं पाहिजे असं मत न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासियो यांनी व्यक्त केलंय. शहराची सर्व परिस्थिती मी व्हाईट हाऊसला सांगितली आहे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले.
आपल्यासारखा विकसनशील देश म्हणून जवळच्या वाटणाऱ्या ब्राझीलमध्ये Coronavirus सारख्या जागतिक संकटाच्या काळातही राजकारणाची चिखलफेक पाहायला मिळते आहे. त्यात थेट राष्ट्राध्यक्ष विरुद्ध प्रांतांचे गर्व्हर्नर असा सामना आहे. “लोकांची गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं शक्य होत नाही म्हणून आपल्या देशाला उत्पादनं बंद करणं परवडणारं नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज