टीम मंगळवेढा टाईम्स।
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील आठवड्यात १५० कोटी ६२ लाख रुपये जमा होणार आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी व अन्य तपशील शासनाच्या लॉगीनवर अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे.
सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२२ दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे आठ तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीसंदर्भात संबंधित तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले होते. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता.
१४६ कोटी ५८ लाख ४४ हजार रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली होती. निश्चित झालेली रक्कम व ऑगस्ट २०२२ मधील राहिलेले ४ कोटी ६२ लाख रुपये असे एकूण १५० कोटी ६२ लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आहेत. आले आहेत.
नुकसानग्रस्तांची यादी जिल्हाधिकारी यादी तयार करण्यासाठी शासनाने लॉगीन आयडी तयार केली आहे. लॉगीन आयडी व त्याचा पासवर्ड संबंधित तहसिलदारांना देण्यात आला आहे.
तहसीलदार सध्या लॉगीन आयडीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अपलोड करीत आहेत. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली जाणार आहे.
पडताळणी करून पुन्हा ती संबंधित तहसिलदारांकडे पाठवली जाणार आहे. मंजूर होऊन आलेली यादी तहसीलदार तलाठीमार्फत संबंधित तालुक्यातील चावडीवर लावणार आहे. त्यानुसार नुकसान भरपाईचे पैसे पुढील आठवड्यात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होणार आहेत.(स्रोत:लोकमत)
हरकत असल्यास करता येते तक्रार
■ नुकसान भरपाईसाठी पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये नुकसान भरपाई मंजूर व नामंजूर होणार आहे, नामंजूर झाल्यास किंवा अन्य अडचण असल्यास संबंधित तहसिलदारांकडे अर्ज करता येणार आहे.
# सप्टेंबर २०२२ मध्ये उत्तर सोलापूर, अक्कलकोट व मंद्रुपमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, मंगळवेढा व सांगोला या तालुक्यात नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे झालेली नुकसान भरपाई प्रलंबित
■ जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये एक लाख २६ हजार ३५१ क्षेत्र बाधित झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांना ९८ कोटी २७ लाख ६२ हजार रुपयाच्या नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र ही नुकसान भरपाई अद्याप प्राप्त झाली नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज