मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडलीय. पापदहंडी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या कृष्णगुडा गावात, एका १४ वर्षांच्या मुलाने ५ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी १४ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलंय. शुक्रवारी सकाळी ५ वर्षांचा मजेश माहुरिया नावाचा मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.

पण बराच वेळ होऊही तो परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. इतर गावकरीही त्याचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना एका जुन्या पडक्या घराचा दरवाजा बंद असल्याचं दिसलं. तेथून दुर्गंधी येत होती.

त्यावेळी माहुरियाच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी तेथील दृश्य पाहून त्यांच्या पाय खालची जमीन सरकरली. तर माहुरिया कुटुंबियांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

त्यांना अख्ख जग एकाच क्षणात थांबल्या सारखं वाटू लागलं. त्यांना बंद घरात मजेश माहुरियाचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे आरोपी मुलगाही घरात उपस्थित होता.

सुरुवातीला त्याने काहीही माहिती नसल्याचे सांगितलं, परंतु गावकऱ्यांनी त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि मारहाण केली. माहिती मिळताच पापडहांडी पोलीस घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी आरोपीला जमावापासून वाचवले आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि घटनास्थळी वैज्ञानिक तपास पथकाला बोलावलं.

पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात ही हत्या सूड घेण्यासाठी करण्यात आली होती असे दिसून आले. काही दिवसांपूर्वी गावात वाद झाला होता.

मजेशचे वडील शिबा माहुरिया यांचे ४,००० रुपये गायब झाले होते. पैशांच्या चोरीचा संशय आल्याने, गावकऱ्यांनी आरोपी मुलाला चौकशीसाठी बोलावले. गावातील सभेत त्याला जाहीरपणे रागवण्यात आले, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला खूप अपमानित वाटू लागलं.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या आरोपी मुलाने बदला घेण्याचे ठरवले आणि तो संधीच्या शोधत होता. शुक्रवारी संधी मिळाल्यावर त्याने निष्पाप मजेशची हत्या केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












