टीम मंगळवेढा टाईम्स।
जुन्या पेन्शनसह अन्य विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, मात्र ती निष्फळ ठरली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात त्यांनी समिती नेमून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र संघटनांना हे मान्य झाले नाही,
शहर जिल्ह्यासह राज्यभर कर्मचारी संघटनांनी आजपासून बेमुदत संप जाहीर केला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही यामध्ये सहभागी झाले आहेत.
मात्र सध्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा सुरु आहे. त्यामुळे बुधवारी गणित 2 चा पेपर आहे, त्याचे काय होणार, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे.
शिक्षकच जर परीक्षा केंद्रावरच आले नाहीत तर परीक्षा घेणार कोण? बोर्डाचे पेपर तपासणार कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज