टीम मंगळवेढा टाईम्स।
अनेक वर्षांपासून झोपून असलेले 105 वर्षाच्या आजोबाला चालता येत नव्हते, असह्य वेदना, कमरेच्या खुब्याचे हाडावर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली अन् बघताबघता काही दिवसांतच स्वतःच्या पायावर वेदनारहित आजोबा चालू लागले.
कमरेच्या खुब्याचे हाड मोडल्यामुळे 105 वर्षाचे आजोबा झोपून होते, अनेक रुग्णालयात दाखवले मात्र वय जास्त असल्यामुळे उपचार करण्यास कोणी तयार होत नव्हते.
कमरेच्या खुब्यामुळे आजोबा त्रस्त झाले होते. अनेक वर्षे तर ते अक्षरश:अंथरुणाला खिळून होते. मंगळवेढा तालुक्यातील माचनुर येथील हरिश्चंद्र डोके असे त्या आजोबांचे नाव आहे.
आजोबाच्या वयामुळे त्यांच्यावर उपचार करणे जीवितास धोका होता, अखेर उपचारांसाठी मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
डॉक्टर प्रवीण सरडा यांनी धाडसी ऑपरेशन करून 105 वर्षाचे हरिश्चंद्र डोके यांना जीवदान दिले.
हरिश्चंद्र डोके यांचे दैनंदिन जीवन-मान विसकळीत झाले होते. त्यांनी अनेक दवाखान्यात उपचार करून पाहिले मात्र त्यांना आजारापासून मुक्तता मिळत नव्हती.
मंगळवेढा येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले अन् त्यांना एक जीवनदान मिळाले.
डॉ.प्रवीण सारडा व त्यांच्या टीमने तातडीने सर्व तपासण्या करून त्यांनी पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केली व पेशंट अवघ्या काही दिवसातच चालू लागला.
ही किमिया डॉ.प्रवीण सारडा व त्यांच्या टीमने केल्यामुळे तालुकाभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हरिचंद्र डोके यांना जीवदान व कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाल्यामुळे त्यांनी डॉ.प्रवीण सारडा यांचे आभार मानले.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज