मरवडे प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याची आर्थिक, सामाजिक, राजकिय क्षेत्रातील राजधानी म्हणुन ओळख असणार्या मरवडे गावामध्ये भारतीय जनता पक्षाचे तालुका उपा-अध्यक्ष, आ.प्रशांतराव परीचारक युवा मंचचे श्रीकांत गणपाटील यांच्या प्रयत्नातुन मरवडे गावातील रस्त्यासाठी १ कोटी ५६ लाख रूपये व अभ्यासकेंद्रासाठी ५ लाख रुपये मंजुर झाल्याची माहिती मरवडे गावचे सरपंच नितिन घुले यांनी दिली.
मरवडे गावातील मासाळ वस्ती कडे जाणार्या रस्त्यासाठी आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्यासाठी १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी श्रीकांत गणपाटील यांनी मंजुर केला आहे आणि लवकरच या कामाला सुरुवात होत आहे.
गावातील मासाळ वस्तीवर ग्रामदैवत महालिंगराया चे मंदिर असुन हा भाग नेहमीच विकासाच्या द्रुष्टीने उदासिन राहिलेला आहे. या भागासाठी हा निधी मंजुर करुन विकासाच्या द्रुष्टीने पहीले पाउल या भागामध्ये उचलेले आहे.
गावातील युवकांचा प्रशासनामध्ये टक्का वाढावा यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र उभारणीसाठी ५ लाख रुपये निधी मंजुर करुन ते कामही आज पुर्णत्वास आलेले आहे या दोन्ही कामासाठी श्रीकांत गणपाटील यांनी वेळीवेळी पाठपुरावा केला आहे,असे मत सरपंच नितिन घुले यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
नेहमीच मरवडे गावच्या विकासासाठी तत्पर असणारे आ.प्रशांतराव परिचारक युवा मंच च्या माध्यमातुन गावासाठी वेगवेगळ्या योजना राबवुन सामाजिक बांधिलकी जपणार्या श्रीकांत गणपाटील यांचे मरवडे ग्रामपंचायत व गावकर्याच्यांवतीने कौतुक होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज