मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । कोरोनाच्या भीतीने राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे.
पण,अजूनही मंदिर, लोकल रेल्वे सेवा, जीम हे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कधी अनलॉक होणार याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे कारशेड, कोरोनाची परिस्थिती आणि मंदिर उघडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.
‘लॉकडाउनमध्ये बंद पडलेले अनेक उद्योग आपण एक एक करून सुरू करत आहोत. हळूहळू सर्व उद्योग धंदे सुरू करण्यात येणार आहे. पण कोविडबद्दल आपल्या सर्वांना आता काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जबाबदारी आपली आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले. दारूची दुकानं उघडली पण मंदिरं का उघडली जात नाही, अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांना विचारयला काय जाते. पण, ही जबाबदारी आमच्यावर आहे. आमचं लोकांवर प्रेम आहे. त्यामुळे निर्णय घेतले नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच संख्या कमी होत चालली आहे. व्हेंटिलेटर आता उपलब्ध होत आहे. पण कोरोना हा पसरत चाललेला आहे. कोरोनाचे रुग्ण आता ग्रामीण भागात वाढत चालले आहे. काही जणांना कोरोना होऊन गेला असेल. तर काही जणांना सौम्य लक्षणे जाणवत आहे. पण, मधुमेह आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी संघर्षमय ठरत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
लॉकडाउनच्या काळात सर्व धर्मियांनी सण हे खबरदारी घेऊन साजरे केले आहे. आता नवरात्र, दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे हळूहळू आपण दारं उघडत आहोत. उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, नाहीतर कोरोना आला तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मला पण गर्दी नकोय पण मास्क हाच आपला ब्लॅकबेल्ट आहे. आपल्या सर्वांना मास्क हा वापरणे बंधनकारकच आहे, असं म्हणत त्यांनी लोकल सुरू करण्याबद्दल नकार दिला आहे.
आम्ही जे करू जनतेच्या हितासाठी करू, जो काही कायदा आला आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या संघटना आणि लोकांशी बोलणे सुरू आहे. त्यानंतरच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. आला कायदा आणि केली अंमलबाजवणी असं होणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी कृषी कायद्याबद्दल स्पष्ट केले आहे.
सध्या कशाला परवानगी आहे?
अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही.
अनलॉक-५ मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज