टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण ग्रामीण भागात झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे.त्यातच रविवारी आलेल्या अहवालानुसार मंगळवेढा तालुक्यात पुन्हा १७ करोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे.तर ५८ जणांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज रविवार दि २७ सप्टेंबर रोजी नागरिकाचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेला नाही.तसेच रविवारी ३२ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. ३२ रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह १० आणि २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा -३ नंदुर-५,शरदनगर-१,ब्रम्हपुरी-१ येथील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वॅब चे ७ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.सदर नागरिक मंगळवेढा-१, दामाजीनगर-१,भोसे-१,नंदूर-१,कागष्ट-२, लक्ष्मी दहिवडी-१ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत ११३१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ७१० रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत २३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घेतली असून नागरिकांनीही घाबरुन न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे मास्क चा वापर करावा व आपल्या आणि इतरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
On Tuesday, 58 people became tax-free in urban and rural areas, but the number of patients affected by 17 coronas increased again.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज