टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या संशयित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यांतून पंढरपुरात सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच
कोल्हापूर, पुणेनंतर आता पंढरपूर शहरातील एका वृद्ध व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंगी आजारात जी लक्षणे दिसून येतात, तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षणे आहेत.
आजाराची प्राथमिक लक्षणे
झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आहे. ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी आणि मळमळणे अशी झिका आजाराची प्राथमिक लक्षणे दिसू येतात.
प्रामुख्याने डासांमार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे ‘जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धुळ फवारणी सुरू केली आहे. याशिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे.
बाधित परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सव्र्व्हे केला असून, चार जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली.
आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे. नागरिकांनी पाणी साठवण्याचे ड्रम किंवा टाक्या उघड्या ठेवू नयेत, पाणी भरण्याची भांडी स्वच्छ व कोरडी ठेवावीत, परिसरात स्वच्छता ठेवावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या रुग्णाची प्रकृती ठीक
पंढरपूर शहरातील एका वृद्धाला झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली असता, रुग्णामध्ये झिका व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. संबंधित रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती ठीक आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.- विजय बागल, जिल्हा हिवताप अधिकारी, पंढरपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज