mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात आजपासून युवा महोत्सवास सुरुवात, स्वागतासाठी संतनगरी असुरलेली; असे असणार नियोजन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 9, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव मंगळवेढ्यातील कदम गुरुजी महाविद्यालयात होणार; वयोमर्यादाही बदलली

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढ्यात आजपासून सुरू होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजनरंगाचा या 18 युवा महोत्सवासाठी येथील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणातील तयारी पूर्ण झाली असून कलाकार विद्यार्थ्यांसाठी स्वागतासाठी मंगळवेढ्याची संतनगरी असुरलेली आहे.

2017 नंतर मंगळवेढ्यात होणाऱ्या दुसऱ्या युवा महोत्सवाचे 57 महाविद्यालयांनी विविध कला प्रकारामध्ये सहभाग घेतला असून, यंदा पावसातही हा युवा महोत्सव तरूणाईला पाहता येणार आहे.

2017 साली झालेल्या पावसामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाल्यामुळे शहरवासीयांना विद्यार्थ्यांच्या कलेचे सादरीकरण पाहता आले नाही. व विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या कलेचे सादरीकरण करता आले नाही.

यंदा मात्र पूर्ण व्यासपीठ वॉटरप्रूफ केले असल्यामुळे सर्व कार्यक्रम पावसात देखील पाहण्याची सोय सोलापूर विद्यापीठाबरोबर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या प्रयत्नाने उपलब्ध केली.

युवा महोत्सवाच्या स्टिकरचे उद्घाटन पक्षनेते अजित जगताप यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाविद्यालयातील प्रांगणात मुख्य रंगमंच सह, इतर रंगमंच, भोजन व्यवस्था, स्वागत कमान उभारण्यात आली असून, 57 महाविद्यालयातील सुमारे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील अशी व्यवस्था करण्यात आली.

शाळेचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद केला आहे. तरुणाईला आकर्षण करणारे सेल्फी पॉईंट, महोत्सवाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टॉलच्या माध्यमातून खाद्य पदार्थासह इतर सुविधा उपलब्ध करून दिली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोफत औषध उपचार केंद्र उभारण्यात आले असून, खाजगी सुरक्षा रक्षकासह पोलीस बंदोबस्त तैनात केला.

संत नगरी असलेल्या मंगळवेढ्यात युवा महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये असलेल्या संत चोखामेळा, दामाजीपंत, कान्होपात्रा, गोपनबाई विहीर, भुईकोट किल्ला तेराव्या शतकातील महादेव मंदिर गैबीपीर दर्गा ही ठिकाणी देखील पाहता येणार आहेत.

त्यामुळे नवरात्र महोत्सवा नंतर आता पुन्हा युवा महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवेढ्यात निर्माण होणाऱ्या गर्दीतून इथल्या व्यवसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आज सकाळी दहा वाजता उद्घाटन आ.समाधान आवताडे, आ.शहाजी बापू पाटील, मा.आ.प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती असून अध्यक्षस्थानी कुलगुरू मृणालिनी फडणवीस या असणार आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होणार आहे.

सध्या राजकीय वातावरणात आ.शहाजी पाटील यांच्या माणदेशी भाषेने सर्वांनाच भुरळ घातली आहे. त्यांचा पुन्हा एकदा रांगडी आवाज उद्याच्या युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना ऐकावयास मिळणार आहे.

या युवा महोत्सवामध्ये 57 महाविद्यालयातील 700 विद्यार्थी व 600 विद्यार्थीनी मिळून 29 कलाप्रकार सादर करणार असून या कलेच्या परीक्षणासाठी राज्यभरातील 40 परीक्षक नियुक्त करण्यात आले आहे.

नऊ ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 114 संघप्रमुख असून महोत्सव समितीचे 25 प्रमुख या सोहळ्या युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.-डॉ. केदारनाथ काळवणे,संचालक विद्यार्थी विकास विभाग

असे असणार नियोजन

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज रविवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापनकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: युवा महोत्सव

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
Next Post
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

मंगळवेढ्यात नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा करनारा ट्रक पाेलीसांनी पकडला; आज्ञात चालक, मालक, दाेन मजूर यांच्याविरूध्द गून्हा दाखल

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा