टीम मंगळवेढा टाईम्स ।
वनविभागामध्ये सरकारी नोकरी लावतो, असे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणास १३ लाख १० हजार रुपये रक्कम घेऊन वनविभाग रांची यांच्या सर्व शिक्क्याचे बनावट नियुक्तिपत्र देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत इकबाल इनामदार (वय २२, रा. इनामदार वस्ती, पाठखळ रोड, मंगळवेढा) यांना फिर्याद दिली. याप्रकरणी सतीश महामुनी, पल्लवी महामुनी, युसूफ पाटील (रा. मंगळवेढा) या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र वनविभागात नोकरी लावतो म्हणून आरोपीने फिर्यादीकडून १३ लाख रुपये घेतले. रांची (झारखंड) या राज्यात वनविभागामध्ये तुमचे काम होईल, अशी हमी दिली.
फिर्यादीच्या वडिलाने दि. १५ एप्रिल २०२४ रोजी प्रशिक्षणकामी फिर्यादीस रांची (झारखंड) येथे पाठविले. फिर्यादी सदर ठिकाणी गेल्यावर त्यास वसतिगृहामध्ये ठेवून लवकरच नियुक्ती होऊन प्रशिक्षण चालू होईल, असे आरोपीने सांगितले.
सदर ठिकाणी फिर्यादीसोबत अन्य दहा-बारा मुले राहण्यास होती. काही दिवसांनंतर फिर्यादीने नियुक्तिपत्राविषयी चौकशी केली. त्यावेळी फिर्यादीस वनविभागाचा गणवेश आणून दिले. नियुक्तिपत्र लवकरच मिळेल, अशी हमी दिली.
दि. २४/२/२०२५ रोजी एक सीलबंद लिफाफा, त्यावर वनसंरक्षण कार्मिक तन अधिकारी कॉलनी डोरांडा वनभवन रांची यांच्या सही-शिक्क्याचे नियुक्तिपत्र फिर्यादीस प्राप्त झाले.
दि.८ एप्रिल २०२५ रोजी नियुक्तीचे पत्र घेऊन चुलत भावासह फिर्यादी हे वनविभागाच्या कार्यालयात गेले असता ते नियुक्तिपत्र बनावट असल्याचे त्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज