
टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-मरवडे मार्गावरुन पायी चालत निघालेल्या हणमंत मधुकर गवळी (वय ३६) या तरुणाला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मोटर सायकलस्वाराने जोराची धडक देवून गंभीर जखमी करुन

त्याच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटर सायकलस्वार इरफान गडवाल (रा.सोलापूर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी समर्थ गवळी (रा.भालेवाडी) यांचे चुलते तथा मयत हणमंत गवळी हे दि. १९ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता मंगळवेढा-मरवडे मार्गावरुन घराकडे जात असताना

पाठीमागून भरधाव वेगात आलेली मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३ ई.एल. ११७५ वरील चालक तथा आरोपी इरफान गडवाल याने

जोराची धडक देवून गंभीर जखमी करुन मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान जखमीला उपचाराकरिता घेवून जाणे अपेक्षीत असताना त्याने नेले नाही. याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.

फटेवाडी येथून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची पोलीसात तक्रार
मंगळवेढा शहरात फटेवाडी येथून लॅबच्या कामानिमित्त गेलेला प्रदीप अनिल पवार (वय २५) हा तरुण बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या वडिलाने मंगळवेढा पोलीसात दिली असून पोलीस त्या तरुणाचा कसून शोध घेत आहेत.

हकीकत या घटनेची अशी, यातील तक्रारदार अनिल पवार हे दि.२२ रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी मुलगा प्रदीप हा एकटाच घरी होता.
तो मंगळवेढा येथे लॅब व्यवसाय करीत असल्याने सकाळी ९ वाजता जातो व संध्याकाळी ९ वाजता घरी फटेवाडी येथे येतो. त्या दिवशी रात्री ९ पर्यंत तो घरी परतलाच नसल्याने त्याच्या मोबाईलवर फोन केला असता फोन बंद लागला.

तद्नंतर रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नसल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तो मिळून आला नाही. त्याचे वर्णन उंची ५.५ फुट, रंग गोरा, अंगात नेसणेस शर्ट व पँट, शरीर बांधा, सडपातळ, शिक्षण बी.ए., बोली भाषा मराठी अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











