टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील ३६ वर्षीय विवाहित महिलेस शिवीगाळ करून तू पोलिसाकडे जा,
नाही तर आमदाराकडे जा आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत विनयभंग केला.
पतीसह मुलांनाही धमकी दिल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल जाली. त्यानुसार तानाजी भागवत कदम, संतोष भागवत कदम, सुजाता तानाजी कदम, रूपाली संतोष कदम (रा.सलगर बुद्रुक,ता.मंगळवेढा) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणते तीन नेते पुन्हा आले एकत्र
पंढरपूर एमआयडीसीच्या मागणीसाठी नुकतेच समाधान आवताडे मुंबईत उद्योगमंत्र्यांना भेटले. त्यांच्याबरोबर मनसेचे नेते दिलीप धोत्रेही होते. प्रशांत परिचारक दिसले नाहीत. पंत नसलेल्या या बैठकीची जिल्ह्याच्या राजकीय गोटात जोरदार चर्चा झाली.
एमआयडीसीच्या जागा पाहणीसाठी नुकतेच अधिकारी येऊन गेले. यावेळी आ.आवताडे, प्रशांत परिचारक आणि दिलीप धोत्रे हे तिघेही एकत्र दिसले.
एकीकडे ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या अधिक जवळ गेले असताना पंढरपूरच्या या नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्यामुळे वेगळ्या राजकीय समीकरणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत एकमेकांविरोधात काम करणारे हे तीनही नेते पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी एकमेकांच्या हातात हात घालून काम करताना दिसले. यामुळे पुन्हा नवी समीकरणं होणार का, याविषयी चर्चा सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज