महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांचे मंत्रीपद अडचणीत आले आहे. Yashomati Thakur’s ministerial post in trouble; 3 months sentence in police beating case!
उल्हास रौराळे या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची साधी कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ठाकूर यांना दखलपात्र गुन्ह्यात शिक्षा झाल्याने त्यांचे मंत्रीपद दावणीला लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
याप्रकरणी अमरावती सत्र न्यायालयात खटला दाखल होता. न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिने शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
VIDEO | Yashomati Thakur | शेवटी सत्याचा विजय होणार : यशोमती ठाकूर@AdvYashomatiINC pic.twitter.com/6weexOVSi5
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2020
अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला यशोमती ठाकूर यांनी मारहाण केली होती. २०१२ मध्ये ही घटना घडली होती. आठ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. रौराळे यांना यशोमती ठाकूर यांच्यासह वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांनीही मारहाण केली होती.
पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांच्या कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्त्यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
तर फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलीस कर्मचारी देखील शिक्षेस पात्र झाला आहे. या शिक्षेनंतर यशोमती ठाकूर यांना बडतर्फ करण्याची मागणी आता भाजपने सुरू केली आहे. पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली.
यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये यशोमती ठाकूर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. ‘आपलं सरकार नव्हतं. आत्ताशी मी फक्त शपथ घेतलीये. खिसे गरम व्हायचे आहेत अजून. मला जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की काही जमलं नाही अजून मॅडम. जे आपल्या विरोधात आहेत, त्यांचे खिसे बंबाटच भरले आहेत.
ते खिसे रिकामे करायला आपल्या घरी आले, तर त्यांना नकार देऊ नका. घरी आलेल्या लक्ष्मीला कोण नाही म्हणतं?’ असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान जाहीर सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तसेच या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांचा कारचालक आमि त्यांच्यासोबत असलेले दोन कार्यकर्तेगी दोषी आढळले आहेत. त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज