मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
करमाळा तालुक्यातील केम येथील तळेकर वस्ती नंबर १ या शाळेमध्ये कार्यरत मुख्याध्यापक कांतीलाल गोविंद काकडे (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कांतीलाल काकडे असलेले त्यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील निंभोरे असून, केम येथील तळेकर वस्ती नंबर १ या शाळेत ते मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होते.
सकाळी केम येथील केंद्र शाळेतील मीटिंग आटोपून कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी ते निघाले असता रस्त्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
निंभोरे येथील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
माणसानं कसं जगावं हे महापुरुषांच्या जीवन चरित्रातून शिकावं : खरात
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन. ते जीवन कसं जगावं ते महापुरुषांच्या चरित्रातून शिकावं. दान केलेली वस्तू पुन्हा वापरायची नाही, हे तत्त्व आयुष्यभर पाळणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे आयुष्यभर गरिबांच्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी अनवाणी फिरत राहिले.
अशा व्यक्तींच्या जीवनापासून आपण जीवन जगण्याची कला शिकायला हवी, असे विचार डॉ. महेश खरात यांनी व्यक्त केले.
वडवळ येथे आयोजित लोकरत्न भाऊसाहेब मोरे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता पाटील होत्या.
यावेळी पोपटबुवा, आकाशबुवा, तेलंगरे, डॉ. प्रमोद पाटील, महेश दिरंगे, सुरेश शिवपुजे, मोहन होनमाने, कालिदास गावडे, संतोष जगताप, संगीता फाटे, कल्पना मुळे, माधुरी मोरे, सविता पवार, राहुल मोरे, धनंजय पवार, बापूसाहेब दळते, अमित मुळे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज