टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतकरी आपल्या शेतात वर्षभर राबून जगाला अन्नधान्य पुरवतात. खऱ्या अर्थाने शेतकरी जगाचा पोशिंदा आहे ,त्यांच्या बरोबरीने शेतामध्ये महिलांचे हे मोठे योगदान असून आदित्य इरिगेटर्स, फिनोलेक्स पाईपचे काम कौतुकास्पद असल्याचे असे गौरवउद्गार सौ.अंजली समाधान आवताडे यांनी काढले आहेत.
त्या बेगमपूर येथे आदित्य इरिगेटर्स व फिनोलेक्स पाईप यांच्या आयोजित केलेल्या महिला शेतकरी मेळाव्यानिमित्त बोलताना होत्या.
यावेळी व्यासपीठावर जि.प सदस्य शैला गोडसे, पुणे येथील फिनोलेक्स पाईपचे विक्री व्यवस्थापक विश्वजीत हारुगडे, फिनोलेक्स पाईप पुण्याचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक संजय अळीकट्टे, फिनोलेक्स पाईपचे गोपाळ आदोने, आदित्य इरिगेटर्सचे मालक जनार्दन शिवशरण, कावेरी भोसले, करुणा शिवशरण आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्तबगार महिला शेतकऱ्यांचा मेळावा हा आगळावेगळा उपक्रम जागतिक शेतकरी दिनाचे औचित्य साधून आदित्य इरिगेटर्स बेगमपूर व फिनोलेक्स पाईप यांच्यावतीने आयोजित केला होता. सदर मेळाव्यास महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
अंजली आवताडे म्हणाल्या, शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतात. भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे.
समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय.
सर्वांना लागणारे अन्नधान्य तो पिकवतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते. त्यामुळे या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा दिला जावे. तसेच पुरुषांच्या बरोबरीने शेतामध्ये महिलाही हातभार लावत असतात.
विश्वजीत हरगुडे म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे महिला घराचा कणा असतात घर व शेती महिला यशस्वीपणे सांभाळतात व पुरुषांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात.
फिनोलेक्स पाईप ४१ वर्षे पूर्ण झाली. आज पर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेले फिनोलेक्सचे प्रॉडक्ट दर्जेदार होते. फिनोलेक्स कंपनीच्या वतीने पुढील काळात महिला शेतकऱ्यांसाठी पुरस्कार व सहलीचे आयोजन करण्याचे जाहीर केले.
यावेळी शैला गोडसे, कावेरी भोसले, विश्वजीत हरगुडे, डोके, वंदना कलुबर्मे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार करुणा शिवशरण यांनी मानले.
रस्त्यामुळे मुलांची लग्न रखडल्याची खंत
कर्तबगार महिला मेळाव्यास मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या पत्नी अंजली अवताडे उपस्थित होत्या. यावेळी महिला शेतकऱ्यांनी माचणूर येथील मळईला जाणारा रस्ता व्हावा यासाठी मागणी केली. अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे . तरी हा रस्ता झाला तर आम्हा महिलांना शेतामध्ये जाण्यासाठी सोय होईल. रस्ता नसल्यामुळे मुलांना मुली देण्यास नकार येत आहेत. अशीही खंत यावेळी महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज