टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात लहान मुले पळविली जात असल्याची अफवा जोरदार पसरविली जात आहे. यामुळे पालक व शाळा शिक्षक वर्गातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अफवांवरून अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शनासाठी आलेल्या एका महिला भक्ताला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, चौकशीत त्या जळगावहून भाविक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुधनी येथेही दोन मुली पळविल्याचे अफवा पसरविली होती. यावर पोलिसांनी मात्र असे काहीच घटना तालुक्यात घडली नाही. अफवा पसरविण्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात लहान मुले पळविणारे टोळी कार्यरत असल्याचे अफवांचे बीज गैरसमजातून पेरले जात आहे.
कर्नाटकातील कथित व्हिडिओ व्हायरल तालुक्यात सुसाटपणे करण्यात आले होते. अशा प्रकारच्या अफवांमुळे प्रत्येक शाळेत आणून सोडताना व शाळा सुटल्यावर परत घेऊन जाताना शाळेकडून संबंधित पालकांच्या सह्या घेतल्या जात आहेत परिणामी सर्वांनाच काम वाढविले आहे.
पोलिसांनी अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे हौशी लोकांना सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा गैरवापर करणे महागात पडणार आहे.
घाबरून जाऊ नये , काही माहिती नागरिकांनी असल्याने पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(स्रोत लोकमत)
दोन महिलांना अटक अन् सुटका
जळगांवचे दोन महिला स्वामी भक्त अक्कलकोट येथे स्वामींचे दर्शन घेऊन गाणगापूर येथे दर्शनाला जाण्यासाठी थांबले होते. त्यांच्या सोबतचे एक महिला काही कामानिमित्त जवळील दुकानात गेले होते.
या घटनेतील एक महिला आजाराने जडली होती. त्यामुळे तिला अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर असे विविध तीर्थक्षेत्राचे दर्शनासाठी जात होते, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.
अफवावर विश्वास ठेवू नका
अक्कलकोट तालुक्यात आशा प्रकारची घटना अद्याप घडली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसं काही वाटल्यास 112 नंबरला कॉल करावे. तत्काळ मदत मिळेल. कोणीही कायदा हातात
घेण्याचे प्रयत्न करू नये. तसेच अफवा पसरवू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल- राजेंद्रसिंह गौर , उपविभागीय पोलीस अधिकारी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज