मंगळवेढा टाईम्स न्युज।
गेली 40 वर्षे माझा आणि राजकारणाशी काही संबंध नव्हता; तरीही नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले. मंगळवेढा शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम करत मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
ती जबाबदारी मी माझ्या मुलाची आणि पतीची मदत न घेता यशस्वी करून दाखवेन, असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी बोलून दाखवून दिला.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष झालेल्या सुनंदा आवताडे यांनी काल नगरपालिका कार्यालयात पदभार घेतला. त्यावेळी झालेल्या सत्कार समारंभानंतर आवताडे बोलत होत्या. आवताडे यांच्या या घोषणेने विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याचे मानले जात आहे.

नगराध्यक्षा सुनंदा आवताडे म्हणाल्या की, मंगळवेढा शहरातील जनतेने दिलेली जबाबदारी मी आईच्या भूमिकेतून यशस्वीपणे पार पाडणार आहे. प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांमधील मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास माझे प्राधान्य असणार आहे.

तीर्थक्षेत्र आघाडीचे नेते भगीरथ भालके म्हणाले, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनासाची पूर्तता करण्यासाठी सर्वानी एकदिलाने प्रयत्न करावेत.

निधीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना भेटून पाठपुरावा करण्यात येईल.

या वेळी नगरसेवक सोमनाथ माळी यांनी शहरात संतसृष्टी उभारण्यासाठी पडीक शासकीय जागांचा वापर करावा, भूमिगत गटार, हद्दवाढ या प्रश्नाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.

जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके, अरूण किल्लेदार, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, नगरसेवक सोमनाथ माळी, प्रमोद सावजी, प्रशांत गायकवाड, अनिल बोदाडे, प्रीती सूर्यवंशी, विद्यागौरी अवघडे,
सीमा बुरजे, अश्विनी धोत्रे, नागर गोवे, रामचंद्र वाकडे, सिध्देश्वर आवताडे, सुशील आवताडे, प्रतिक किल्लेदार, कमालपाशा मुल्ला, महादेव धोत्रे, गणेश धोत्रे, आयाज शेख, यश नागणे, अजित यादव, आयेशा शेख, दीपाली शिंदे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














