टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात विराट सभा झाली. या वेळी त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारचा कडक शब्दात समाचार घेतला.
‘सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आंतरवली सराटीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घ्या. तसेच २४ डिसेंबरपर्यंत विनाअट आरक्षण द्यावे अन्यथा गाठ मराठ्यांशी आहे’, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण न दिल्यास १७ डिसेंबर रोजी आंतरवालीत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल,’ असेही त्यांनी जाहीर केले.
भाजप आमदार नारायण कुचे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचाही जरांगे पाटील यांनी समाचार घेतला. राज्य सरकार कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफटका करत आहे.
मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘सरकारला अन् पोलिसांना आम्ही आतापर्यंत सहकार्यच केले आहे. मात्र यापुढे अपेक्षा ठेऊ नये असा इशारा दिला आहे.
कुचेंना ऊस तोडायला जावे लागेल
आमदार नारायण कुचे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना आम्ही कोणताही त्रास दिला नाही. कुचे माझ्यासोबत एक बोलतात अन् तिकडे काड्या लावतात. आमच्या सोबत गेम करायचा नाही अन्यथा कुचेंना ऊस तोडायला जावे लागेल. धनंजय मुंडे यांच्या परळीतही मराठा मतदार आहेत, त्यांनाही बघून घेऊ, असा इशारा जरांगे यांनी दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज