टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यात १७३ उमेदवारांचा पराभव झाला. विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांना २३ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
अन्यथा निवडणूक लढविण्यास त्यांच्यावर निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. जे भावी आमदार खर्च सादर करणार नाहीत, त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविता येणार नाही.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणी झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली.
त्यामुळे २३ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करावे लागणार आहे. दुसरीकडे निवडणूक निरीक्षकांकडून संबंधित खर्चाची तपासणी होणार आहे.
यापूर्वी उमेदवारांच्या खर्चाची तीन वेळा तपासणी झाली. त्यात काही त्रुटी राहिल्या. संबंधितांना त्रुटी पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली. काहींनी त्रुटी पूर्ण केल्या आहेत, तर काहींनी अद्याप त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. अशांना अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुख्य निवडणूक आयोग घेणार निर्णय
अधिक माहिती देताना गणेश निहाळी यांनी सांगितले की, निवडणूक प्रचार सुरू असताना रोजचा खर्च रोज सादर करण्याची सूचना उमेदवारांना केली होती. काहींनी यास प्रतिसाद दिला, तर काहींनी हिशेब सादर केला नाही.
अशांना नोटीस दिली आहे. यात शंभराहून अधिक अपक्ष उमेदवारांचा सहभाग आहे. २३ डिसेंबरपर्यंत खर्च सादर न करणाऱ्यांची यादी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत.
अधिकारी प्रथम चौकशी करतील. चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. जिल्हाधिकारी संबंधित उमेदवारांवर दोष निश्चित करून कारवाई करण्याचा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज