mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

येत्या 12 ऑगस्ट पर्यंत डिजिटल फलक लावा; अन्यथा मंगळवेढ्यातील ‘या’ कार्यालयासमोर प्रहारचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 8, 2022
in मंगळवेढा
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून ज्या क्रांतिकारकांनी या देशासाठी बलिदान दिलं त्याचं खऱ्या अर्थानं आपण गौरव केला असे मला वाटत.

पण हे करत असताना आजही ग्रामीण भागातील लोकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ आपल्याला देता आला नाही याची मला खंत वाटते. आजही पाणी,वीज तसेच आरोग्य सुविधा हा गंभीर प्रश्न आहे.

बऱ्याच कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत त्यामुळे त्याचा त्रास नागरिक व इतर कर्मचाऱ्यांना होतो आहे.

तसेच आजही गावातील नागरिकांना / ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून कोणता लाभ घेता येतो याची माहिती नाही त्यामुळे या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही.

ग्रामपंचायत कडून 101 योजना आहेत पण माहीती अभावी तसेच डिजिटल बोर्ड ग्रामपंचायत मध्ये नसल्यामुळे लोकांना माहीत होत नाहीत लोकांना फक्त ग्रामपंचायत मधून घरकुल मिळते एवढंच माहित आहे त्यामुळे हे डिजिटल फलक लावण्यात आले पाहिजेत.

हर घरापर्यंत शासकीय योजनेचा लाभ कसा देता येईल यासाठी सीओ साहेबांनी विचार केला पाहिजे. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता पण जर स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे झाली तरी लोकांना शासकीय योजनांची माहीती होत नसेल तर याचा विचार आपण केला पाहिजे.

माझ्या भागातील सर्व सामान्य नागरिकांना ग्रामस्थांना कशा पद्धतीने शासकीय योजनांचा लाभ देता येईल यासाठी सीओ साहेबांनी प्रयत्न केला पाहिजे.

आज जवळ जवळ दोन ते अडीच महिने झाले आम्ही डिजिटल फलक लावण्यात यावे यासाठी लेखी व तोंडी मागणी करत असताना आज पर्यंत आम्हाला या संदर्भात गट विकास अधिकारी यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.

जर येत्या 12 ऑगस्ट पर्यंत फलक लावण्यात आले नाहीत तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षा कडून देण्यात आला.

यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष संतोष पवार जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजू सावंत जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील,जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या सह तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी,शहर अध्यक्ष सचिन साळुंके,कार्याध्यक्ष अमोग सिद्ध काकणकि, संपर्क प्रमुख सिद्धेश्वर पाटील, तानाजी माने, बापूसाहेब घोडके, उपाध्यक्ष चेतन वाघमोडे,

दत्ता पाटील,बापू मरीआई वाले,विलास सलगर, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर,विभाग प्रमुख सारिका कवचाळे ,विभाग संपर्क प्रमुख महेश तळऴे,फैयाज मुलानी,

अमोगसिद्ध् पाटील, हमीद इनामदार, बंडू कोळी, आप्पाराया काकनकी,सिद्धाप्पा काकनकी,मल्लु तळ्ळे, शशी कोळी,नागनाथ म्हमाणे,दत्ता कोरे,संतोष परीट,अक्षय मोहिते,आप्पा आसबे,लक्ष्मण बिराजदार,दादा वाघमोडे,बिरू पांढरे, समर्थ आसबे, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रहार संघटना

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात बोगस खताचा साठा आढळला; 'त्या' कृषी केंद्राचा खत विक्री परवाना निलंबित

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..