टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम समाजाला मिळवून देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहे.
ते मंगळवेढा नगरपालिकेच्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत लोकनेते म.अहमदभाई हुसेन मुलाणी मुस्लिम सभागृह उद्घाटन समारंभा प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिनदर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, स्वतंत्र सैनिक पाशा पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, उद्योजक आझाद दारुवाले, नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी,
उद्योजक साहेब उगाडे, प्रहारचे समाधान हेंबाडे, युवराज शिंदे, तन्वीर इनामदार, डॉ.अस्लम मुलाणी, उद्योजक शकील काझी, सौकात सुतार, अबूबकर सुतार, फिरोज मुलाणी, जमीर इनामदार आदीजन उपस्थित होते.
आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून निधीची मागणी केली आहे. काम करत असताना मी कधीच राजकारण केले नाही.
सर्व समाजातील लोकांच्या घरात जाऊन मी जेवण केले आहेत, एवढे सर्वांचे प्रेम माझ्या सोबत आहे. मुस्लिम समाजातील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी मी काम करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुलेमान तांबोळी यांनी केले तर आभार आझाद पटेल यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज