देवानंद पासले : टीम मंगळवेढा टाईम्स
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथे तळ्यातील गाळ व काटेरी झाडे काढण्यासाठी भैरवनाथ शुगर उद्योग समूह चे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते नारळ फोडुन कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कामासाठी भैरवनाथ शुगर कडून जेसीबी मशीन देऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. याप्रसंगी भैरवनाथ शुगर चे जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, कृष्णदेव लोंढे , मारोळी चे सरपंच बसवराज पाटील, माजी सभापती तानाजी काकडे,
महादेव देवकर ,शिवाजी चव्हाण ,खतबुद्दीन शेख, महादेव लोखंडे ,शिव पाटील, आप्पा माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, गुलाब थोरबोले व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल सावंत म्हणाले की, भविष्यामध्ये अशा सामाजिक कार्यास हातभार लावणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मारोळी गावच्या ग्रामस्थांनी अनिल सावंत यांचे कौतुक करून आभार मानले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज