मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
दि.१४ मे २०२५ रोजी आपण केलेल्या कारवाई नुसार बठाण येथील वाळूचा ठेका बंद करून योग्य तो निर्णय घेतला असून याच अनुशंगाने मौजे उचेठाण येथील सद्यस्थिीत चालू असलेला अवैध वाळूचा ठेका हा सुरू आहे.
तरी सदरील वाळूचा ठेका बंद करून मौजे उचेठाण व बठाण या दोन्हीही ठेकेदारांवर महसूल शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
अन्यथा उचेठाण येथील वाळू ठेका बंद न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंदारे यांनी दिले आहे.
तरी सदरील ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई बाबतचा योग्य तो निर्णय न घेतल्यास मी दि.२६ मे २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर
दुपारी ठिक ०२.०० वाजता आत्मदहन आंदोलन करणार आहे. तरी आपण माझ्या अर्जाचा गांर्भीयाने विचार करून माझ्या सारख्या गरीब सामाजिक कार्यकर्त्यास योग्य तो न्याय द्यावा असेही आवाहन प्रकाश खंदारे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय
मी आजपर्यात सदरील अवैध चालू ठेकेदारांसंदर्भात अनेक अर्ज केले तरी माझ्या कोणत्याही अर्जाचा कोणत्याच कार्यालयात गांभीर्यपूर्वक पध्दतीने विचार केला नाही
व त्याबाबतीत मला कार्यालय यांच्याकडून लिखीत स्वरूपात उत्तर अथवा त्यांचे म्हणणे मिळालेले नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.- प्रकाश खंदारे सामाजिक कार्यकर्ते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज