mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महत्त्वाची बातमी! मंगळवेढा तालुक्यातील ‘हे’ गाव सार्वत्रिक निवडणुकीवर घालणार बहिष्कार; ग्रामस्थांचा बैठकीत झाला निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 18, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार; मंगळवेढ्यातील ‘या’ गावाचा समावेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दक्षिण मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी पट्यात येणाऱ्या सलगर बुद्रुक सह परिसरातील गावांमध्ये अजूनही व्यवस्थित पोहचले नाही.

त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीवर 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील प्रमाणेच बहिष्कार घालणार असा निर्णय सलगर बुद्रुक वासीय घेन्याच्या तयारीत आहेत.

27 मार्च 1986 रोजी म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामाचे उद्घाटन पार पडले.या सिंचन योजनेची पहिली पाणी चाचणी 1 मार्च 1999 रोजी घेण्यात आली.ही सिंचन योजना सुरू होऊन तब्बल 38 वर्षे उलटून गेली आहेत.तरीही हक्काच्या पाण्यापासून सलगर बुद्रुक व परिसरातील गावे तहानलेलीच आहेत.

कामे अपूर्ण आणि पाणी वाटप कमी-गेल्या दोन वर्षांपासून सलगर बुद्रुक येथे म्हैसाळचे पाणी गावातील ठराविक भागात येत आहे.पण सलगर हे गाव या योजनेतील शेवटच्या गावांपैकी एक गाव आहे.त्यामुळे या योजनेत समाविष्ट असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांची तहान भागल्यानंतरच पाणी सलगर करांच्या वाट्याला येत आहे.

त्यामुळे पाणी वाटपात होणारा अन्याय आपण का खपवून घ्यायचा असा सवाल सलगर कर उपस्थित करत आहेत. दरम्यान ग्रामस्थांनी या प्रश्नी बैठक बोलावली होती.

येत्या दोन दिवसात पाणी नाही आल्यास परत एक अशीच बैठक बोलवून येणाऱ्या लोकसभा व विधासनसभेच्या निवडणुकीवर पुन्हा बहिष्कार टाकणार अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली.याला सर्व ग्रामस्थांनी पाठींबा दर्शविला.

बैठकीतच आमदारांचा फोन अन.. – पाणी प्रश्नासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत गावातील प्रमुख व्यक्तींची भाषणे सुरू होती.या बैठकीची माहिती कळताच आमदार समाधान आवताडे यांनी व्हिडीओ कॉल द्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला.गावकऱ्यांचे गाऱ्हाणे एकूण घेतले.व याप्रश्नी तात्काळ लक्ष घालून येत्या दोन दिवसात याप्रश्नी बैठकीसाठी योजनेतील अधिकाऱ्यांसमवेत गावाला भेट देतो असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बैठक आटोपती घेतली.

आमच्या गावाला मैसाळ योजनेचे पाणी मंजूर असून सुद्धा व्यवस्थित मिळत नाही

#कायम दुष्काळी असलेल्या आमच्या गावाला मैसाळ योजनेचे पाणी मंजूर असून सुद्धा व्यवस्थित मिळत नाही. शिवाय या योजनेतील बरीच कामे कासावगतीने होत आहेत.शेजारील जत तालुक्यातील गावांमध्ये पाण्याचा अखंड प्रवाह सुरू असतो.त्यामुळे आम्हाला पाणी नाही मिळाल्यास,हक्काच्या पाण्यासाठी 2009 प्रमाणेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर  बहिष्कार घालन्याविषयी विचार करत आहोत.-शिवशंकर धायगोंडे,शेतकरी सलगर बुद्रुक-

येत्या दोन ते तीन दिवसात सलगर बुद्रुकला पाणी सोडण्यासाठी सांगितले

सलगर बुद्रुक व परिसरातील गावांमध्ये पाण्याअभावी दुष्काळी परिस्थिती आहे.पाणी प्रश्नासंदर्भात आयोजित केलेल्या गावकऱ्यांच्या बैठकी बाबत कळताच मी गाकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.व लगेचच म्हैसाळ योजनेतील संबधीत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून येत्या दोन ते तीन दिवसात सलगर बुद्रुकला पाणी सोडण्यासाठी सांगितले आहे.- समाधान आवताडे-आमदार मंगळवेढा –

गावांना पाणी देणेचे नियोजन आहे

मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात 19 गावे असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे टेल टू हेड याप्रमाणे प्रत्येक गावांतील
मागणीनुसार पाणी देणे आले आहे. सद्य परिस्थितीत सलगर बुद्रुक आणि सलगर खुर्द या गावांतून मागण्या येत असून म्हैसाळ योजनेच्या उर्वरित लाभक्षेत्रातील गावांना पाणी दिले नंतर 4 ते 5 दिवसांत या गावांना पाणी देणेचे नियोजन आहे.- महेश पाटील,अधिकारी  मैसाळ योजना जलपंदा विभाग सांगली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सलगर बु ता मंगळवेढा

संबंधित बातम्या

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 18, 2026
मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
Next Post
सिद्धापूर फेस्टिवलमध्ये विविध क्षेत्रातील ‘या’ व्यक्तींना पुरस्कार वितरण; अभ्यासिका होण्यासाठी आ.आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार; सोमनाथ आवताडे

सिद्धापूर फेस्टिवलमध्ये विविध क्षेत्रातील 'या' व्यक्तींना पुरस्कार वितरण; अभ्यासिका होण्यासाठी आ.आवताडे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार; सोमनाथ आवताडे

ताज्या बातम्या

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 18, 2026
मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..