टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने मंगळवेढ्याच्या शिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या
रानभाज्या, रानफळे यांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरीकांना होण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले आहे.
सेंद्रिय भाजीपाला कट्टा आठवडा बाजारात सकाळी 10 वाजता रानभाजी महोत्सव सुरू होईल. या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , बाळासाहेब शिंदे , उपविभागीय कृषी अधिकारी , नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये रानभाज्या , रानफळे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक रानभाजीचे वैशिष्ट्य आरोग्यवर्धक गुणधर्म जीवनसत्व व खनिज संपन्नता बाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
तरी सर्व शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज