मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दौंड येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या जवानाने सोलापुरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

विलास सर्जेराव शिंदे असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आणि पत्नी आहेत.

दरम्यान विलास शिंदे यांनी आत्महत्या का केली? याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे.या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

विलास शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत मात्र मागील काही वर्षांपासून मुळेगाव येथे सासरच्या घरी पत्नी, मुलांसह राहत होते. ते दौंड येथील एसआरपीएफ बल गट क्रमांक 7 मध्ये कार्यरत होते.

काल अचानक त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

दरम्यान मृत जवानाची पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत. विलास शिंदे आणि पूनम काळे यांचा 2014 मध्ये प्रेमविवाह झाला होता.

दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.विलास शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या आत्महत्येच्या घटनेने दोन्ही मुलांच्या डोक्यावरील वडिलांच छत्र हरपलं आहे.

एसआरपीएफ जवान शिंदे यांनी आत्महत्या का केली कारण अद्यापही अस्पष्ट आहे. प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












