टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुलांना भांडण करू नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने शिक्षक पतीच्या डोक्यात मोबाइल ने मारहाण करून त्यास जखमी केले, तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत पत्नीविरोधात शिक्षक पतीने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत इसबावी-पंढरपूर येथे राहणारे फिर्यादी प्रेमचंद फुलचंद हतागळे हे शिरभावी (ता.सांगोला) येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. २२ जून रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची मुले भांडणं करीत असताना हातागळे यांनी त्यांना भांडू नका असे सांगितले.
याचा त्यांच्या पत्नीस राग आला. तिने मोबाईल पतीच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली.
तसेच शिवीगाळी करून दमदाटी केली. त्यानंतर हातागळे यांनी शहर पोलिसात जाऊन फिर्याद दिली आहे.
…मग पंढरपूरची जागा कोणाला…
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले आहे. हा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपकडे आला होता. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकविण्यात यश आले होते. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेते महायुतीकडे होते.
आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. त्यात भर म्हणून अभिजित पाटील यांनाही सोबत घेण्यात भाजपचे नेते यशस्वी ठरले होते. तरीही काँग्रेसला तब्बल ४५ हजाराचे मताधिक्य मिळाले.
हा अहवाल पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे लोकसभेला हानी विधानसभेला भरून काढण्यासाठी मोठी खेळी करावी लागणार आहे. कारण, त्यामुळे पंढरपूरची जागा मिळविण्यात कोण यशस्वी ठरणार, याची कुजबुज आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज