मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. वरातीत नाचल्यामुळे पत्नीला बेल्टने पतीने मारहाण केल्यामुळे पतीसह तिघांवर गुन्हा करण्यात आला आहे.
वरातीत नाचल्याच्या कारणावरून नवऱ्याने बायकोला पट्ट्याने मारहाण केल्याने पत्नी जखमी झाली. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील वैदुवाडीत हा प्रकार घडला.
काजल किरण गुडील (वय २५, रा. वैदूवाडी, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे फिर्याद दिल आहे. त्याच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
काजल यांचे पती किरण याने त्यांना वरातीत का नाचलीस, या कारणावरून पट्ट्याने मारहाण केली. त्यात पट्ट्याच्या स्टीलचा बक्कल पंजावर लागून त्या जखमी झाल्या.
तसेच फिर्यादी यांची आत्या भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील इतर आरोपींनी कपाळावर हाताने ठोसा मारून जखमी केले.
शिवाय फिर्यादीची आई यांना देखील शिवीगाळ करत हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी काजल यांच्या फिर्यादीवरून पती किरण गोविंद गुडील, सासरे गोविंद गुडील, दीर दुर्गा गोविंद गुडील (रा. वैदुवाडी, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज