टीम मंगळवेढा टाईम्स ।
ग्रामीण भागातून कॉलेजला येणाऱ्या १८ वर्षीय कॉलेज युवतीचा वेळोवेळी पाठलाग करून तु मला प्रेमासाठी रिस्पॉन्स का देत नाही, तु माझी नाही झाली तर दुसऱ्याची पण होवू देणार नाही, तुझ्यावर अॅसीड टाकेन अशी धमकी देवून
जातीवाचक शिवीगाळ करीत तीची ओढणी ओढून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी विवेक उर्फ बबलू भुसे (रा. नागणेवाडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील १८ वर्षीय कॉलेज युवती ही ग्रामीण भागातून कॉलेजसाठी दररोज एस.टी. बसने ये जा करते. दि.१/९/२०२३ ते १/२/२०२४ च्या सकाळी ११.३० दरम्यान वरील आरोपीने पिडीता ही एस.टी. बसमधून उतरून – कॉलेजला जात असताना नेहमी पाठलाग करीत असे.
तसेच कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना एस.टी.त बसल्यावर खिडकीतून पिडीतेची ओढणी – ओढायचा, रस्त्याने चालत असताना तु मला प्रेमात रिस्पॉन्स का देत नाही, तु माझ्याकडे नाही पाहिले तर तुझ्यावर अॅसीड टाकेन,
तु माझी नाही झालीस तर दुसऱ्याचीही होवू देणार नाही अशी धमकी देत होता. पिडीतेचे वडील आजारी असल्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून पिडीतेने घरी सांगणे टाळले होते. मात्र आरोपी हा सतत त्रास देत असल्यामुळे नाईलाजाने घडला प्रकार आईस सांगितल्यावर आई वडीलांनी आरोपीस समजावून सांगितले होते.
तरीही तो वारंवार पाठलाग करीत असे. पिडीता दि. ३० जानेवारी रोजी बसमधून उतरून कॉलेजकडे जात असताना जवळ येवून त्याने पिडीतेस तु मला खूप आवडतेस आपण दोघे पळून जावून लग्न करू असे म्हणाला असल्याचे पिडीतेने तीच्या भावास सांगितल्यानंतर भाऊ मोटर सायकलवरती घेवून शाळेत येत असे.
भाऊ येत असल्याने त्याने पिडीता व तीच्या भावाकडे तो रागारागाने पहात असे. सकाळी ११.३० च्या दरम्यान दामाजी चौकात आरोपीने पिडीतेच्या भावाजवळ येवून तु तिला गाडीवर का आणले? ती तुझी कोण आहे असे म्हणून डाव्या डोळयाजवळ बुक्की मारून जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान शाळा, कॉलेजसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कॉलेज व शाळा सुटल्यानंतर दुपारी बसस्थानकावर मुलींची गर्दी मोठी असते.
या दरम्यान उडाण मुले या परिसरात नेहमीच वावरत असतात. याला पायबंद घालण्यासाठी पोलिस ठाण्याकडे असलेले दामिनी पथक बसस्थानक ते शहरातील सर्व कॉलेजदरम्यान दैनंदिन गस्त घातल्यास अशा प्रकारांना निश्चित आळा बसेल असा सूर सुज्ञ पालकवर्गातून उमटत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज