टीम मंगळवेढा टाईम्स ।
देशातील रिक्त शासकीय पदांच्या मुद्दयाकडे लक्ष वेधत सद्यःस्थितीत ‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे ‘बेरोजगारीची गॅरंटी’ झाली आहे, अशी खोचक टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी केली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला महागाई व बेरोजगारी नियंत्रित करण्यात घोर अपयश आले. केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक वर्गाला निराश केल्याचा प्रहार प्रियंकांनी केला आहे.
प्रियंका गांधी ट्विटरवरून म्हणाल्या की, देशात सद्यःस्थितीत ३० लाख पदे रिक्त आहेत. आपले कोट्यवधी युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मागील १० वर्षांत भाजप सरकारने नोकरभरती केली नाही.
ही पदे भरण्याचा केवळ दिखावा करण्याशिवाय सरकारने आणखी काहीही केले नाही. मागील आठ वर्षांत २२ कोटी युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले; पण प्रत्यक्षात ७ लाख युवकांनाच नोकरीची संधी मिळाली आहे.
याबाबत जुलै २०२२ मध्ये सरकारने संसदेत माहिती दिली आहे. याचाच अर्थ असा की, २१.९३ कोटी युवक अजूनही देशात बेरोजगार आहेत, असे टीकास्त्र प्रियंका गांधी यांनी सोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे वचन दिले होते; पण परिस्थिती वेगळीच आहे. अगोदरच अस्तित्वात असलेल्या नोकऱ्या युवकांना देण्यात आलेल्या नाहीत.
तसेच सरकारने नव्याने रोजगारही दिला नाही. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत जी आश्वासने देतात, ती हवेतच विरतात. प्रत्यक्षात त्यांची गॅरंटी ही बेरोजगारीची गॅरंटी असते, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात नव्याने नोकऱ्या देण्यासंबंधित कोणतेही आश्वासन दिलेले नाही. तशी सरकारची कोणतीही योजना दिसून येत नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बेरोजगारीविषयी एक शब्दही उच्चारला नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी नुकतीच केली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज