टीम मंगळवेढा टाईम्स।
आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मंगळवेढ्यात उघडकीस आली आहे. केवळ “माझे जेवण का खाल्ले?” या कारणावरून चिडलेल्या मुलाने चक्क
आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात अॅल्युमिनियमची कढई मारून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढ्यातील जाधव वस्ती येथे राहणाऱ्या संगीता जाधव (वय ४५) यांनी ७ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास जेवण बनवले होते.

जेवण केल्यानंतर त्या घरासमोर कणसे सोलत बसल्या होत्या. इतक्यात त्यांचा मुलगा ओंकार आप्पासो चव्हाण तेथे आला. त्याने आपल्यासाठी ठेवलेले जेवण कोणी खाल्ले, अशी विचारणा केली.

जेव्हा आईने “मी जेवण खाल्ले आहे” असे सांगितले, तेव्हा ओंकारचा राग अनावर झाला. त्याने घरातील भाजीची अॅल्युमिनियमची कढई उचलली आणि थेट आईच्या डोक्यात प्रहार केला.

रक्तबंबाळ अवस्थेत आईने गाठले पोलीस स्टेशन
हा हल्ला इतका भीषण होता की आईच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढला.

गंभीर जखमी अवस्थेतही धाडस दाखवत संगीता जाधव यांनी एस.टी. बसने मंगळवेढा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि त्यांच्या तक्रारीवरून मुलावर गुन्हा नोंदवला आहे.

मंगळवेढा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपी मुलाचा शोध घेतला जात आहे. किरकोळ कारणावरून जन्मदात्या आईवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










