मंगळवेढा टाईम्स । संपादक : समाधान फुगारे (7588214814)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला नऊ दिवस बाकी असताना दिवसेंदिवस प्रचार तोफा रंगू लागल्या आहेत.
मतदारसंघांमध्ये प्रमुख लढत ही भाजपचे समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अनिल सावंत, काँग्रेसकडून भगीरथ भालके व मनसे कडून दिलीप धोत्रे यांच्यात होत आहे.
तर प्रमुख लढत म्हणून जनता समाधान आवताडे व अनिल सावंत, भगीरथ भालके यांच्याकडे पाहत असली तरी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग हा आमदार कोण होणार? हे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
गेले कित्येक वर्ष दुष्काळी भाग म्हणून दक्षिण भागाकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीमध्ये दक्षिण भागातील जनता पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण होणार हे ठरणार असली तरी सर्वसामान्य जनता मात्र गुळगुळीत रस्ते व पाण्या प्रश्नी आता बोलू लागली आहे. जवळपास 65 हजार मतदान असलेली ही 45 गावे आहेत.
पाणी प्रश्नावरून दक्षिण भागातील जनतेने आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिले मात्र अद्यापही प्रत्यक्षात पाणी मात्र आले का नाही हे त्यांनाच माहीत.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली ही 45 गावे आहेत. त्यात म्हैसाळ योजनेचे शिरनांदगी, आसबेवाडी व लवंगी तलावात पाणी आले असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला.
दक्षिण भागासाठी महत्वकांक्षी योजना असलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन झाले आहे. येत्या काही वर्षात पाणी दक्षिण भागात जाणार आहे. याच योजनेमुळे मतविभागनीचा टर्निंग पॉईंट ठरला आहे.
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी तीन हजार कोटी रुपये निधी मतदारसंघाला खेचून आणला व विकास केला असा प्रचार सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी आणलेला तीन हजार कोटी रुपये निधीत कोणती कामे केली? असा सवाल प्रत्येक सभेत उपस्थित करत आहेत.
दरम्यान, अनिल सावंत हे कोणावर टीका न करता मला केवळ मतदारसंघाचा विकास करायचा आहे, तरुणांच्या हाताला काम मिळवून द्यायचे आहे, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करायचे आहे असे प्रत्येक सभेत सांगत आहेत.
तर मनसेचे दिलीप धोत्रे हे विद्यमान आमदार यांनी जनतेची फसवणूक केली आहे. आधुनिक युगाचा मंगळवेढा-पंढरपूर तयार करण्यासाठी मला संधी द्या अशी विनवणी करत आहेत.
भगीरथ भालके यांनी प्रचाराचा नारळ फोडून गावभेट दौरा सुरू केला आहे. मतदारसंघात परिवर्तन करायचे आहे, मला एक संधी द्या असे आवाहन दौऱ्यात करत आहेत.
विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी विकासात्मक निधी देऊन काही योजना मार्गी लावल्या आहेत व म्हैसाळचे पाणी देखील मिळवून दिले आहे तर अनिल सावंत यांनी भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले आहे, सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठी झेप घेतली असून अनेक गोरगरीब लोकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. तर भगीरथ भालके यांनी दिगवंत आमदार भारत नाना यांनी केलेली विकास कामे जनता विसरत नाही , नानांनी जनतेच्या मनावर अधिराज्य केले होते, जनता मला संधी देणार आहे तर मनसेचे दिलीप धोत्रे हे नवखे असून यांना कितपत जनता स्वीकारेल
दुष्काळी 45 गावात 65 हजार मतदान असले तरी या तीन वर्षात दुष्काळी गावामध्ये काय काय विकास कामे झाली कोणत्या योजना मार्गी लागल्या? कोणी उद्योग सुरु केले? कोणी पाठ फिरवली? याचे मूल्यमापन करूनच योग्य तो उमेदवाराला मतदान करणार आहेत.
65 हजार मतदार हे मंगळवेढा-पंढरपूरचा आमदार ठरवणार असल्याचे आता बोलले जाऊ लागले असले तरी यात आवताडे, सावंत, भालके यांच्यात कशी विभागणी होईन कोणत्या उमेदवाराला अधिका अधिक मताधिक्य मिळेल हे 20 नोव्हेंबरलाच समजेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज