मंगळवेढा टाईम्स न्युज ।
इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी शाळेच्या रेग्युलर दहा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी बनावट तोतया दहा विद्यार्थी बसवून लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेजने

एकूण वीस विध्यार्थ्यांचे करिअर बरबाद तर केलेच पण त्याचं बरोबर सुशिक्षित शिक्षकांचे गाव म्हणून राज्यात ओळख असल्याचे लक्ष्मीदहिवडी गावची प्रतिमा राज्यभर मालिन केली आहे.

नंदेश्वर येथील बाळकष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रात दि.२० फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी विषयाच्या पेपर बसलेल्या लक्ष्मी दहिवडी येथील ९ विद्यार्थी व १ विद्यर्थिनी यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा कोठडी वाढ करण्यात आली.

न्यायालयाने पुन्हा २७ तारखेपयंत पोलिस कोठडीत वाढ केली होती. तर बनावट विद्यार्थी पुरवठा करणाऱ्या आर. के. अकॅडमी संचालक रवी कोंडकिरे यालाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मात्र सुतार इंटरनॅशनल स्कूलच्या कोणत्याही शिक्षकाची त्या मुख्याध्यापकाची व संस्थापकाचे अद्याप चौकशी केल्याचे दिसून येत नसून पोलीस तपास भरकटवून शाळेकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

एकाच शाळेच्या 10 विद्यार्थ्यांच्या ठिकाणी तोतया विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित शाळेने ठरवून केलेला कार्यक्रम असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असतानाही केवळ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

या तोतया विद्यार्थ्याप्रकरणी सर्वस्वी सुतार इंटरनॅशनल स्कूल जबाबदार असल्याची चर्चाही गावात होत असून शाळेचा निकाल चांगला लावण्यासाठी असा प्रकार केल्याचेही चर्चा आहे.
शाळेने केलेले या वर्तनामुळे प्रामाणिकपणे शिक्षण देणाऱ्या संस्थांनाही पालकांकडून वेगळ्या नजरेने पाहिले जात असून लक्ष्मी दहिवडी सारख्या सुशिक्षित शिक्षकांच्या गावात असा प्रकार घडल्यामुळे शाळांनी असे प्रकार करूनच हे शिक्षक घडविलेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शाळांचे संस्थापक ते शिक्षक या सर्वांना दोषी धरून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. यामध्ये दोषी असलेल्या शाळेच्या पूर्ण प्रशासनावर गुन्हे दाखल करून त्यांनाही जेलची हवा मिळायला हवी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













