टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-सोलापूर बस मध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे दागीन्याची पर्स चोरून नेण्याला प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी माधुरी कैलास खटकळे (राहणार बेलाटी, ता.उत्तर सोलापूर)
या दिनांक ९ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान मंगळवेढा बस स्थानकावर सोलापूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या.
दरम्यान सोलापूरला निघालेल्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पर्समध्ये ठेवलेले तीन लाख वीस हजार रुपये किंमतीचे विविध दागिने चोरून नेले असून अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.
दरम्या, मंगळवेढा बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा असून देखील वारंवार चोरीची घटना बसमध्ये चढत असताना घडत असल्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून याबाबत पोलिसांनी दक्ष राहून चोरीची उकल करणे गरजेचे आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज