mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सगळं गेल्यावर आता पत्ते खेळत बसण्याशिवाय काही काम राहिले नाही; उमेश परीचारकांची भगीरथ भालकेवर सडकून टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 11, 2022
in राजकारण, सोलापूर
सगळं गेल्यावर आता पत्ते खेळत बसण्याशिवाय काही काम राहिले नाही; उमेश परीचारकांची भगीरथ भालकेवर सडकून टीका

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत पंढरपुरातील काही नेते प्रचारासाठी येत आहेत, त्याच सगळं गेल्यामुळे आता म्हातारं होईपर्यंत पत्त्यांचे डाव खेळत बसण्याशिवाय काही काम राहिले नसल्याची टीका युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी नाव न घेता भगीरथ भालकेंवर केली आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये रंगली असून सभेतील वक्तव्यामुळे आता नेत्यांतील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

भीमा कारखान्याची सत्ता गेले 10 वर्षे कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आहे. सध्या या कारखान्याची निवडणूक भलतीच रंगात आली असून खासदार महाडिक यांच्या सोबत राष्ट्रवादीचे उमेश पाटील,

भगीरथ भालके, काँग्रेसचे पदाधिकारी, एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील उतरल्याने महाडिकांची बाजू भक्कम दिसत आहे.

महाडिकांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राजन पाटील यांच्या मदतीला पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट उतरल्याने निवडणूक बोचऱ्या वक्तव्याने गाजू लागली आहे.

उमेश परिचारक यांनी आपल्या सभेत बोलताना महाडिकांना उद्देशून तुमच्या आई-वडिलनाचे जसे संस्कार केले, तसा तुम्ही प्रचार करणार, असा जिव्हारी लागणार टोला लगावला होता.

याला कारण ठरले होते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे निवडणूक प्रचारात बाहेर आलेले व्यंगचित्र. यामुळे दुखावलेल्या उमेश परिचारक यांनी भाषणाच्या ओघात महाडिक गटाने पूर्वी सुधाकर परिचारक यांचेवर भ्याड हल्ला केला असे अनेक दुष्कृत्य महाडिक गटाने केल्याचा आरोप केला.

याला लगेचच उत्तर देतांना खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबावर घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या अवलादींनी आम्हाला संस्कार शिकाऊ नयेत, असे उत्तर दिल्याने सहकारातील या लढाईत आता भाजप खासदार धनंजय महाडिक विरुद्ध भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक असा संघर्ष चिघळू लागला आहे.

सध्या भाजपमध्ये आलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे देखील महाडिकांच्या स्टेजवरून राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत.

सभांतून सुरु झालेल्या या वैयक्तिक आरोप प्रत्यारोपामुळे मात्र निवडणुकीचे वातावरण खराब होऊ लागले आहे.

कारखान्यातील सभासदांना केवळ चोख वजन काटा आणि एफआरपी नुसार चोख भाव एवढीच अपेक्षा असताना संपूर्ण निवडणूक वेगळ्याच वाटेल भरकटवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे धनंजय महाडिक यांनी आरोप केला आहे.

महाडिक यांनी आपल्या काट्यात 1 किलोचा फरक पडला तर 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले असून उसाला 2600 रुपयांचा दर जाहीर केला आहे. भीमा कारखान्यासाठी दि.13 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून दि.14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भीमा कारखाना

संबंधित बातम्या

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
Next Post
नागरिकांनो सावधान ! पोलीस असल्याची बतावणी करीत वृद्ध व्यक्तीला गंडविले

अस्ताव्यस्त! मंगळवेढ्यातील 'त्या' शिक्षकाचे चोरटयांनी पळविलेले ते कपाट शेतात सापडले

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेच्या दिवशीच राडा! शेताच्या जुन्या वादातून सासू-सुनेला काठीने केली बेदम मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 22, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लव्ह मॅरेजची चर्चा! बेपत्ता तरुणीचा शोध लागला; प्रियकराशी विवाह करून थेट मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर, वडिलांच्या जागी पतीला दिले प्राधान्य

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..