टीम मंगळवेढा टाईम्स ।
व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर कंपनी काम करत आहे. या इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp मध्ये अनेक सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत.
त्यामुळे व्हॉट्सअॅप चॅट हॅक होणं अतिशय कठीण आहे. परंतु काही हॅकर्स विविध मार्गांनी युजर्सच्या व्हॉट्सअपमध्ये एन्ट्री करुन चॅट हॅक करण्याचा प्रयत्न करतात.
चुकून एखाद्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअॅप ओपन राहिल्याने एखादा मित्र किंवा इतर कोणी तुमचं चॅट पाहत नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होतो.
तुमचं चॅट कोणी लपून पाहतं, की नाही हे पाहण्यासाठी एक ट्रिक आहे. याद्वारे युजर्स सहजपणे व्हॉट्सअॅप चॅटची माहिती मिळवू शकतात.
अनेकदा युजर्स आपल्या स्वत:च्या चुकीमुळेच समोरच्याला आपलं चॅट पाहण्याची संधी देतात. अशात युजर्सच्या बेजबाबदारपणामुळे व्हॉट्सअॅप हॅक होतं.
एखाद्याकडून तुमच्या चॅटचा चुकीचा वापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणी तुमचं चॅट लपून पाहत तर नाही ना हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची आवश्यकता नाही. युजर्स त्यांच्या व्हॉट्सअॅपवरच ही माहिती मिळवू शकतात.
सर्वात आधी WhatsApp ओपन करा. आता WhatsApp Web पर्यायावर क्लिक करा. जर तुम्ही स्वत: लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर व्हॉट्सअॅप ओपन केलं नसेल आणि तरीही WhatsApp Web मध्ये ते लिंक्ड (Linked) असल्याचं दिसत असेल, तर तर दुसरा व्यक्ती तुमचं व्हॉट्सअॅप चॅट पाहत असल्याची शक्यता असू शकते.
तुम्ही एखाद्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर व्हॉट्सअॅप लिंक केलं असेल आणि लॉगआउट करणं विसरल्यास, दुसऱ्या व्यक्तीने ही संधी साधून आपल्या लॅपटॉपमध्ये तुमचं व्हॉट्सअॅप लिंक केलेलं असू शकतं. त्यामुळे आधीपासूनच तुमचं WhatsApp Web Linked दिसत असेल, तर ते त्वरित लॉगआउट करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज