mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

देशात काय स्वस्त… काय महाग? सामान्यांवरील करात वाढ होणार का? आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 1, 2023
in राष्ट्रीय
Budget 2022 : अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त, काय महाग?; पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार… जाणून घ्या

टीम मंगळवेढा टाईम्स। 

देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवार, 31 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.

त्यानंतर संसदेत देशाचा पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर आज अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस असून आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

देशाच्या कृषी क्षेत्राने वार्षिक 4.6 टक्के वाढ नोंदवली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशाच्या विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात अहवालात नमूद करण्यात आले.

मागील काही वर्षात भारत कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून नावारुपास आला असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. वर्ष 2021-22 मध्ये निर्यात ही 50.2 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचली.

तर 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली असून सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक (World Economic Outlook) या अहवालात भारताच्या जीडीपी वाढीच्या दराविषयी भाकित केलं आहे. IMF च्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात 6.8 टक्के इतका भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर असेल, पुढील वर्षी हा दर 6.1 टक्के अपेक्षित आहे तर त्यापुढील म्हणजे 2024-25 मध्ये आर्थिक वृद्धी दर 6.8 टक्के राहिल असा अंदाज आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याचा दावा मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी केला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागारांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक अहवालातील बारकावे स्पष्ट केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अर्थसंकल्प 2023

संबंधित बातम्या

Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

काय सांगताय..! बायकोने दीड कोटींना नवरा विकला, गर्लफ्रेंडने पैसे मोजताच दिला ‘हँडओव्हर’; ‘जुदाई’च्या रियल लाइफ स्टोरीची गावभर चर्चा

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्थसंकल्पानंतर सोन्याचे दर कमी होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती…

January 26, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

January 22, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
Next Post
बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

बजेटमधून दिलासा! तुम्हाला टॅक्समध्ये 7 लाखांपर्यंत सूट कशी मिळणार? हे समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा