टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी भागाच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघाला नसल्यामुळे हा भाग विकासापासून वंचित आहे.
आम्ही भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून व तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आमच्या पद्धतीने शक्य होईल तितका या भागासाठी प्रयत्न केला आहे यापुढेही करत राहू.
नागरिकांनी समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावोगावची राजकीय परिस्थिती, लोकांचे प्रश्न, लोकांचा कल जाणून घेण्यासाठी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत हे गावोगावी भेट देत आहेत.
या निमित्तानेच मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील महत्त्वपूर्ण असलेल्या पाठकळ गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी अनिल सावंत यांनी पाटकळ येथील ग्रामस्थांसोबत विविध विषयांवर चर्चा केली लोकांची मते जाणून घेतली.
यावेळी सरपंच ऋतुराज बिले, ग्रामपंचायत सदस्य प्रदीपभाऊ पवार ग्रामपंचायत सदस्य आबासो सावंत, भारत कोळेकर, कृष्णदेव लोंढे,
दामाजी कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय सावंत, भीमराव मोरे, बिरूदेव गडदे, नवनाथ वाघमोडे, विजय ताड, मारुती सावंत, सतीश उन्हाळे, समाधान डांगे, स्वप्निल शिंदे हे उपस्थित होते.
आज ‘या‘ गावात असणार दौरा
अनिल सावंत यांचा गावभेट दौरा सकाळी 10 वा ,तामदडी,10.30 ला बोराळे , 11 वाजता सिध्दापुर, 12 वाजता अरळी येथे गावभेट दौरा होणार आहे.
या भागातील सर्व नागरिकांनी आपल्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल सावंत यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज