मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
आम्ही अन्नभेसळचे अधिकारी आहोत असे बसून सोलापूर जिल्ह्यातील एका गावात टपरी छलकाकडून एक लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे.
तडवळ (ता. अक्कलकोट) येथे एका पान टपरी धारकास आम्ही अन्न व भेसळ अधिकारी आहोत, तू अवैध गुटखा व्यवसाय करतो, दोन लाख रुपये दे अन्यथा तुला खोट्या अडकवू असे धमकी देऊन एक लाख रुपये व एक घटना दि. १० जूनला दुपारी दीड वाजता घडली. याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शिवानंद भीमशा कोळी (वय ४६, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, शनिवार दि. १० जूनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गौरी सिद्धाराम चिन्नुरे (रा. सोलापूर) व इतर दोन अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष चालक यांनी कोळी यांच्या घरात जाऊन अन्न व भेसळ सुरक्षा कार्यालय, सोलापूर येथील पथकातील अधिकारी व कर्मचारी आहोत.
तुम्ही तुमचे घरात गुटखासाठा केला आहे. असे सांगून फिर्यादीचे घराची झडती घेतली असता, घरात काही एक गुटखासाठा मिळालेला नाही. तुझ्यावर आम्ही खोटा गुन्हा दाखल करू अन्यथा दोन लाख रुपये खंडणी दे अशी फिर्यादीत धमकी दिली.
कोळी यांच्याकडून एक लाख रुपये आणि हातातील एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी घेऊन गेले. पोलिसांनी गौरी चिनूरे हिस अटक केली आहे. आफ्रिन पटेल (रा. नई जिदगी, सोलापूर) फिरोज पठाण (रा.अकोलेकाठी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पटेल व पठाण यांना अक्कलकोट येथील न्यायालयात उभे केल्यानंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात एक कार जप्त केली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांच्या आदेशानुसार काकडे, पोलिस हवालदार सुरेश जाध आहे. गुटखाचा साठा केला आहे. असे सांगून अटक केली आहे. पटेल व पठाण यांना पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या अजय भोसले आदींनी कारवाई केली.(स्रोत:लोकमत)
संशय आला मग चौकशी केली…..
बनावट छापा टाकलेल्यांनी सोलापुरात येवून आणखीन ५० हजार रुपये देण्यास सांगितले. दुकानदाराने सोलापुरात येताना दोघा-तिघांना सोबत आणले होते. सात रस्ता येथे भेट घेण्याचे ठरल्यानंतर एक महिला कार मध्ये आली.
यावेळी त्यांनी शिवानंद कोळी यांच्यासोबत इतरांना पाहिल्यानंतर पळ काढला. याचा संशय आल्यानंतर कोळी यांनी अन्न, औषध कार्यालयात चौकशी केली. यावेळी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज