टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाणी टँकर घरासमोर घेवून जाण्याच्या कारणावरून पाणी टँकर चालकास चिडून एकाने लोखंडी पाईपने मारून जखमी केल्याचा प्रकार खवे येथे घडला असून या प्रकरणी शंकर राजू काळे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवेढा तालुक्यात पाण्याची तीव्र भीषणता जाणवत असून खवे येथे मागील काही महिन्यापासून वाडया वस्तीवरून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
दरम्यान जि.प.पाणी पुरवठा विभागाकडे एकदमच पंधरा गावातून टँकरची मागणी आली आहे.खवे येथे दि.24 रोजी सकाळी 9.00 वा. यातील टँकर चालक तथा जखमी फिर्यादी दत्तात्रय भोसले (रा.खवे) हे येड्राव येथील वाडयावस्त्यावर पिण्याचे पाणी वाटण्याचे काम करीत असताना
सकाळी 10.00 वा.येड्राव ते भाळवणी रोडवर यातील आरोपीने येवून माइया घरासमोर पाण्याचा टँकर घेवून चल असे म्हणाला.यावेळी फिर्यादी म्हणाले तुमच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता आहे का ते बघतो त्यानंतर गाडी घरासमोर घेवून जावू.
असे म्हणताच आरोपीने चिडून जावून शिवीगाळी करीत त्याच्या हातातील लोखंडी पाईपने चालकाच्या उजव्या हाताला व उजव्या मांडीवर मारहाण केली.
यावेळी जवळच असलेले जे.सी.बी.चे चालक विनोद माळी यांनी पळत येवून भांडण सोडविले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज