टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने वर्षभरासाठी अपघात विमा उतरविण्यात आला आहे. मंदिर समितीच्या व्यवस्थापनाने याची माहिती दिली.
मंदिर समितीच्या या अपघाती विमा योजनेचे भाविकांनी स्वागत केले आहे. अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येकी २५ भाविकांना २ लाख रुपये मिळणार आहेत.
एकूण ५० लाख रुपयांचा विमा होणार, अपघाताने दोन अवयव निकामी झाल्यास २५ भाविकांना १ लाख रुपये मिळणार, २५ लाख रुपयांचा विमा होणार,
अपघाताने एक अवयव निकामी झाल्यास २५ भाविकांना ५० हजार रुपये मिळणार. १२ लाख ५० हजार रुपयांचा विमा होणार, अपघातात दवाखाना खर्च २५ भाविकांना २५ हजार रुपये मिळणार.
६ लाख २५ हजार रुपयांचा विमा होणार असून ९३ लाख ७५ हजार रुपयांचा विमा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून उतरवण्यात आला आहे.
ही आहेत अपघातस्थळं
सुरक्षित वारी ही थीम धरून मंदिर समितीने अपघात विमा हा नवा उपक्रम आणला आहे.
पंढरपूर नगरपालिका क्षेत्र , ६५ एकर जमीन, विठ्ठल – रुक्मिणी मंदिर व परिसर, दर्शनरांग, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, भटुंबरे, शेगाव दुमाला, वाखरी पालखी तळ अशी ठिकाणे असणार आहेत.(स्रोत:लोकमत)
काय कागदपत्रे लागतील ?
यासाठी अपघाती व्यक्तीने किंवा नातेवाईकांनी कागदपत्र अर्ज, पोलीस विभागाकडील कागदपत्रे, जबाब आणि प्रथम माहिती अहवाल, स्पॉट पंचनामा मूळ प्रत, चौकशी पंचनामा मूळ प्रत पोस्टमार्टम रिपोर्ट मूळ प्रत पोलिसांचा सीआरपीसी १७४ चा अंतिम अन्वेषण अहवाल मूळ प्रत,
मृत्यूदाखला मूळ प्रत कायदेशीर वारस प्रमाणपत्र मूळ प्रत, विहित नमुन्यातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, मयत भाविकाचे रेशनकार्ड, आधार कार्ड व मतदान कार्ड, वारसाचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे आस्थापना शाखा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडे सादर करावी लागणार आहेत.
आजपर्यंत ६ व्यक्तींना या अपघाती विम्याचा लाभ मिळवून दिला
वारक -यांच्या सुरक्षीततेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अपघाती विमा उतरवला असून या विम्यापोटी ९ लाख ४० हजार रुपये विमा कंपनीला भरले आहेत.
तो एक वर्षासाठी आहे . मंदिर समिती प्रत्येक वर्षी २५ अपघाती व्यक्तीला विम्याचा लाभ देते. २०१५- २०१६ पासून आजपर्यंत ६ व्यक्तींना या अपघाती विम्याचा लाभ मिळवून दिला आहे. – बालाजी पुदलवाड , मंदिर समिती व्यवस्थापक.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज