टीम मंगळवेढा टाइम्स ।
संत दामाजी कारखान्या संबंधित विरोधकांनी आमच्यावर कर्जाच्या बाबतीत बिनबुडाचे आरोप केले आहेत. फक्त एक महिना थांबा येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात यांचा प्रामाणिकपणा समोर येईल असा हल्लाबोल आमदार समाधान आवताडे यांनी केला आहे.
आज सुतमील येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते कारखान्याबाबतीत विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत.
याप्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक सुरेश भाकरे, उद्योजक अविनाश मोरे , भारत निकम, नगरसेवक चंद्रकांत पडवले आदीजन उपस्थित होते.
आमदार आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्याचा राजवाडा संत दामाजी कारखाना हा अबाधीत राहिला पाहिजे यादृष्टीने चालू संचालक मंडळाने काम करावे,
विविध बँकेचे प्रमुख यांच्यासोबत आहेत त्यामुळे हे सर्वजण मिळून कारखान्याला वेळोवेळी मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कारखाना 6 वर्ष विना अडथळा चालू ठेवला
दामाजीसाठी वेळप्रसंगी आम्ही संचालक मंडळाच्या नावावर कर्ज काढून कारखाना 6 वर्ष विना अडथळा चालू ठेवला. जुन्या तंत्रज्ञानाचा कारखाना आहे. कमीत कमी खर्च करून पैशाची बचत करण्याची भूमिका आम्ही पार पाडली होती.
विरोधक चुकीच्या पद्धतीने आकडेवारी सांगून दिशाभूल करत आहेत. यांनी खरी माहिती सर्वांना दिली पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी यांच्यात प्रामाणिकपणा असेल तर खरी माहिती प्रसिध्द करून सभासदांना वाचायला देतील.
सभासदांची साखर अखंडितपणे 10 रुपयांनी मिळाली पाहिजे
सभासदांची साखर अखंडितपणे 10 रुपयांनी मिळाली पाहिजे, सभासदांच्या साखरेत यांनी दर वाढ न करता 10 रुपये प्रमाणे साखर दिली पाहिजे.
भंगार विकलेला अधिकृत अहवाल आलेला आहे
आमच्या कार्यकाळात भंगार विकलेला अधिकृत अहवाल आलेला आहे. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नये सत्य सगळ्यांना माहिती आहे.
आत्तापर्यंत एक ही चेक बोउन्स नाही
आम्ही कारखाना चालवत असताना आत्तापर्यंत एक ही चेक बोउन्स होऊ दिला नाही. एवढा पारदर्शक कारभार आम्ही केला आहे.
अँड.नंदकुमार पवार यांच्या कार्यकाळात केस हरली; कारखान्याचे कोट्यवधी रुपये पाण्यात
समविचारी गटाचे नेते अँड.नंदकुमार पवार यांच्या कार्यकाळात केस हरली, या केस मध्ये कारखान्याचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले , शेवटी वकील असून देखील अपयश आले.
पोटच्या मुलाचे नाव दुसऱ्याच्या नावावर कोणी लावले
नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता समविचारीची जागा दाखवून देतील, पोटच्या मुलांची नावे दुसऱ्याच्या नावावर लावून निवडणुका लढवल्या तुम्ही केलेले भ्रष्टाचार हे जनतेला माहिती असल्याची टीका केली.
नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्याविरोधात खोट्या केसेस कोण दाखल करायला गेले होते.
मंगळवेढा नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्याविरोधात खोट्या केसेस दाखल करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता. तुमचा कारभार सगळ्या जनतेने पाहिला आहे.
प्रचार सभेत बोलल्याप्रमाणे आपण कामकाज करावे
समविचारी नेत्यांनी प्रचार सभेत बोलल्या प्रमाणे आपण कारखान्याचे कामकाज करावे. कारखाना कोणाच्या मालकीचा नाही. कारखाना अबाधित रहावा यासाठी सभासदांनी लक्ष द्यावे.
त्या मुलांची DNA टेस्ट करा
आमची गरज भासल्यास आम्ही मदतीसाठी येणार असून कागदी घोडे नाचावयाला सगळयांना येत असतात, तीन मुलांची DNA टेस्ट करा सगळा गोलमाल बाहेर पडेल असा टोला लगावला.
प्रशांत परिचारक व आम्ही पक्षाने दिलेला आदेश पाळू
मी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. प्रशांत परिचारक व आम्ही पक्षाने दिलेला आदेश पाळू. येणाऱ्या निवडणुका पक्ष पातळीवर होणार असल्यामुळे आम्हा दोघांना तो निर्णय मान्य असेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज