टीम मंगळवेढा टाईम्स।
देशात सुरू असलेल्या परिस्थितीमुळे जनतेच्या मनात भाजपविषयी तीव्र संताप निर्माण झालेला आहे. आणि काँग्रेस विषयी तितकीच विश्वासाहर्ता पुन्हा तयार होत आहे.
एकीकडे भाजपला मतदार अक्षरशः वैतागला आहे. आणि काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काँग्रेसला पुन्हा नव्याने मिळत असलेल्या गतवैभवाचे मतात रुपांतरण करण्यासाठी काँग्रेसने आपल्या सत्ता काळात केलेला विकास समजावून सांगत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
मंगळवेढा येथे आयोजित तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मारुती बापू वाकडे, दादा पवार ,भीमराव मोरे ,पांडुरंग निराळे ,विष्णु शिंदे, शिवशंकर कवचाळे,
दीपक सदाबसे, दादासो ढेकळे, कल्लाप्पा पाटील, बाबुराव पाटील, दिलीप जाधव ,पांडुरंग जावळे, राजाभाऊ चेळेकर ,अमोल मम्हाने , फिरोज मुलानी, मुबारक शेख ,
सुलेमान तांबोळी, सत्तार भाई इनामदार, जयश्री कवचाळे, नाथा ऐवळे ,सुनीता अवघडे, भीमराव कांबळे ,बापू अवघडे ,एडवोकेट रविकिरण कोळेकर ,मनोज माळी ,राजू बामणे वकील ,पांडुरंग निराळे ,
बाबुराव पाटील ,आयेशा शेख, बजरंग चौगुले, आबा पाटील, संतोष क्षीरसागर, नामदेव डांगे, राजन ठेंगील, शहाजी कांबळे ,बंडोपंत खडतरे, शिवदास पुजारी, रविराज खडतरे ,आकाश भोसले, सचिन कोळेकर,
संग्राम दुधाळ, राजाराम पाटील, विलास शिलेदार ,फारुख मुजावर, सैफन शेख ,तसलीम आकुंजी, रवींद्र शिवशरण, म्हाळाप्पा शिंदे, अजय आधाटे यांचे सह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघातील विकास कामातून वेळ न मिळाल्यामुळे मी सोलापूर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात वेळ देऊ शकले नाही.
पण यापुढे कार्यकर्त्यांनी फक्त साद दिली की मी त्यांच्या आधी जनतेच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करेन. अगदी गावोगावी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अग्रेसर राहीन.
गेल्या काही वर्षात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जो अपमान सहन करावा लागला आहे तो यापुढे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. याशिवाय कार्यकर्त्यांनी आढावा बैठकीत जे जे प्रश्न उपस्थित केले ते सर्व प्रश्न येत्या अधिवेशनात मांडणार आहे.
विधानसभा मतदारसंघाध्यक्ष मारुती वाकडे आपल्या मनोगतात म्हणाले की, विद्यमान तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी अत्यंत तळमळीने आमच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत आणि युवकांना सोबत घेत मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीचे काम अत्यंत जोमाने सुरू ठेवले आहे. त्यांना तालुक्यातील सर्वच पदाधिकारी सहकार्य करीत आहेत यापुढेही करत राहतील. पक्षातील वरिष्ठांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले पाहिजे.
भावी खासदार प्रणिती शिंदे
तालुकाध्यक्ष प्रशांत साळे हे आपले प्रास्ताविक करत असताना आ.प्रणिती शिंदे यांचा भावी खासदार असा उल्लेख करताच उपस्थित सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मात्र यावेळी आ.प्रणिती शिंदे म्हणाल्या की पक्षाचे वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याचा अगदी मनापासून प्रचार करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. मग तो उमेदवार कोणीही असू शकतो. साळे यांच्या प्रास्ताविकानंतर ज्या ज्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्या सर्वच मान्यवरांनी प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे आवाहन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज