टीम मंगळवेढा टाईम्स |
मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांसाठी विठाई परिवार हक्काची बँक म्हणून नावारूपाला येणार असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
विठाई परिवार महिला अर्बन बँकेच्या मंगळवेढा शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, धनश्रीचे सर्वेसर्वा प्रा.शिवाजीराव काळुंगे, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, संचालक गोपाळ भगरे,
माजी नगरसेवक अजित जगताप, सहाय्यक निबंध पी.सी दुर्गुडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे, माजी नगराध्यक्ष भारत नागणे आदीजन उपस्थित होते.
आ.आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, नागरिकांना वेळोवेळी अर्थसाहाय्य विठाई परिवार करेल त्यांचा तालुक्याचा व जिल्ह्याच्या आर्थिक विकासात बँकेचे योगदान मोठे ठरणार आहे.
चेअरमन स्वप्निल काळुंगे यांच्या दूरदृष्टीकोनामुळे बँक आज सोलापूर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आली असल्याचे म्हणाले.
सर्वांनी आपली बँक म्हणून विठाई परिवारास सहकार्य करावे असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे.
उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांनी बँकिंगचे महत्व समजावून सांगितले व विठाई परिवार आपली हक्काची संस्था असल्याचे सांगितले.
गुरुवर्य श्री औदुंबर गडदे महाराज बोलताना म्हणाले की, अनेक नागरिक बँकेकडून कर्ज घेतात पण केवळ कर्ज घेणे एवढेच नागरिकांचे काम नसून त्या कर्जाची वेळेत परतफेड करणे हे सुद्धा महत्वाचे आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये एल के पीचे व्हाईस चेअरमन सुभाष दिघे, पद्मावती मल्टीस्टेट व्हा.चेअरमन आकाश पुजारी,मुढवीचे सरपंच महावीर ठेंगील, यशोदा महिला पतसंस्थेच्या नीलाबाई आटकळे, श्रद्धा क्लिनिकचे डॉ.सुरेश काटकर,
कचरेवाडीच्या सरपंच लताबाई अवताडे, शिवव्याख्याते ज्ञानेश्वर जाधव, उद्योजक प्रदीपकुमार देशमुख, श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे, मेजर तानाजी हेंबाडे, शुभारंभ अर्बन संस्थापक गणेश सूर्यवंशी आणि बँकेचा अधिकारी वर्ग उपस्थित होते.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने विठाई परिवार महिला अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
मोहोळ तालुक्यातील शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आता मंगळवेढा येथे शाखा सुरू झाली आहे.
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
“आम्ही आपल्या विश्वासाचा सन्मान करतो” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी विठाई परिवार महिला अर्बन ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन काजल काळुंगे यांनी सांगितले आहे.
12 टक्के वार्षिक व्याजदर
विठाई परिवार अर्बन येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.
दाम दुप्पट ठेव 6 वर्ष
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व नागरिकांना सहा वर्षात आपले पैसे दाम दुप्पट करून दिले जाणार आहेत.
लखपती ठेव योजना
नागरिकांनी 25 हजार 501 रुपये भरल्यानंतर तेरा वर्षांनी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच 39 हजार रुपये भरल्यानंतर नऊ वर्षांनी 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 59 हजार रुपये भरल्यानंतर फक्त पाच वर्षांनी एक लाख रुपये ग्राहकांना मिळणार आहेत.
0.5 टक्के व्याजदर जादा
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 18 महिन्याच्या पुढे 12 टक्के व्याजदर राहील.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, करंट खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी ९ ते सायं ६,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज