टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्यातील संतांच्या समाधीला खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून भेट दिली असून प्रलंबित स्मारकासाठी संसदेत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, माजी नगराध्यक्ष अरुणा माळी,भगीरथ भालके, लतीफ तांबोळी, तानाजी काकडे, पांडुरंग ताड, बसवराज पाटील, पक्षनेते अजित जगताप, संभाजी रोकडे, विजय खवतोडे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, प्रा.पी.बी पाटील, दामाजी शुगरचे उपाध्यक्ष तानाजी खरात, संगीता कट्टे , उद्योजक महादेव मुदगुल, अरुण किल्लेदार, सोमनाथ माळी, इंद्रजित घुले, सुरेश कट्टे आदीजण उपस्थित होते.
खा.सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाले की, संत चोखामेळा व संत बसवेश्वर स्मारकासाठी तसेच विजापूर-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी संसदेत पाठपुरावा करून लवकरच लवकर मार्गी लावण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खा.सुप्रिया सुळे यांनी जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाबरोबर संत चोखामेळा समाधी व संत कान्होपात्रा समाधीला भेट देऊन माहिती घेतली आहे.
सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्त्यांना चकवा
संत चोखामेळा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सुळे या जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवीला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. कार्यकर्त्यांची गर्दी पाहून त्यांनी गाडीत बसून पंढरपूर कडे जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर काही मिनिटातच त्या परत येऊन संतांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
दरम्यान, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी त्यांच्या निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली असून यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज