टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवार दि.9 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत श्वसन रोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संचालक डॉक्टर शरद शिर्के यांनी दिली आहे.
डॉ.अमोल चव्हाण (एम.बी.बी.एस DNB मेडिसिन नवी दिल्ली, लीलावती हॉस्पिटल, मुंबई) हे या शिबिरामध्ये तपासणी करणार आहेत.
जर तुम्हाला ही लक्षणे असतील तर तपासणी करून घ्या..!
नागरिकांना खोकला, छातीत घरघर, थुंकी (बेडका), छातीतील घट्टपणा, धाप लागणे, घोरणे अशा प्रकारची लक्षणे असतील तर सोमवारी आयोजित शिबिरात तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत एक्स-रे मिळणार..
नागरिकांना लक्षणे आढळल्यास मोफत एक्स-रे काढून दिला जाणार आहे. तसेच मोफत वैद्यकीय सल्ला व विशेष तपासण्यावर 20% सवलत देण्यात येणार आहे.
तसेच बांधकाम कामगार मंडळचे कार्ड असल्यास मोफत एडमिट करणार करून उपचार करण्यात येणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज