अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने बुधवार दि.28 ऑक्टोंबर सकाळी 10 वाजता मायक्रो फायनान्स कर्ज माफ करावे वीज बिल माफ करावे या मागण्या साठी मंगळवेढा प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असून सदरच्या मोर्चामध्ये सर्व शेतकरी मजूर कामगार महिला सर्वांनी मोर्चा मध्ये सामील व्हावे असे आव्हान मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुरज फुगारे यांनी केले आहे.
सध्या कोरोना महामारी मुळे देशाची आर्थिक स्थिती अतिशय मंदावलेली असून अनेक नागरिकांना मागील 7 महिन्यापासून हाताला काम नसलेल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे मायक्रो फायनान्स बचत गट यांची सर्व कर्ज माफ करावे मार्च ते ऑगस्ट पर्यंतचे विज बिल माफ करावे व अवकाळी पावसामुळे झालेल्या सर्व पिकांची नुकसानभरपाई त्वरित मिळावी या मागण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेच्या वतीने बुधवारी दि.28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता मंगळवेढा प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदरचा मोर्चा हा श्रीराम मंगल कार्यालय येथे सुरू होऊन दामाजी चौक ,शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक ते प्रांत कार्यालय असा राहणार आहे. तरी जनतेच्या न्याय व हक्कासाठी मंगळवेढा तालुक्यातील सर्व महिला व पुरुष सदरच्या विराट मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष सुरज फुगारे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज